शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरली, सोलापुरातील २७३ ग्राहकांवर गुन्हे दाखल

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 15, 2023 17:26 IST

महाविरणचा झटका, सर्वाधिक २१५ गुन्हे पंढरपूर विभागात

सोलापूर : महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असलेल्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता २७३ ग्राहक चोरून वीज वापरताना सापडले. अशांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी पंढरपूर विभागात २१५ सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली. बारामती परिमंडलात मुख्य अभियंता यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी या प्रकरणी धडक कारवाई केली. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे, शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार कारवाईत आढळून आले आहेत. बारामती परिमंडळात एकूण ३२९ ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.३८ लाखांचा दंड वसूल करण्यासाठी प्रयत्न..वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल भरले नाही तर महावितरणकडून कनेक्शन तात्पुरते बंद केले जाते. पुढील तीन महिन्यातही जर थकबाकीचा भरणा केला नाही तर मात्र कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले जाते. जोपर्यंत त्या बंद कनेक्शनची थकबाकी व्याज व दंडासहित भरली जात नाही तोवर त्या जागेवर नवीन कनेक्शन दिले जात नाही. बारामती परिमंडलात अशा प्रकारच्या पाच हजारांहून अधिक प्रकरणांची पडताळणी झाली. ज्या ठिकाणी थकबाकीचा भरणा झाला त्यांना वगळून तब्बल ३२९ प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यात त्या ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये तब्बल ३७ लाख ९५ हजारांचा दंड आकारण्यात आला असून तो वसूल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.वीज चाेरांचे धाबे दणाणले सातारा जिल्हा : ०१सोलापूर जिल्हा : २७३बारामती मंडल : ५५एकूण : ३२९

टॅग्स :electricityवीज