शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विनंतीनुसार बदली

By admin | Updated: July 16, 2014 01:01 IST

गुडेवारांची बदली: शासनाचे म्हणणे सादर

सोलापूर : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार करण्यात आली, असे म्हणणे राज्य शासनातर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावर न्यायालयाने सुनावणीची तारीख २८ जुलै नेमली आहे. न्या. नरेश पाटील व न्या. रवींद्र घुगे यांच्यासमोर आयुक्तगुडेवार यांच्या बदलीविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. यात आज शासनातर्फे सरकारी वकिलाने लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. आयुक्त गुडेवार यांची बदली त्यांच्या विनंतीवरूनच करण्यात आली, असे त्यात नमूद केले आहे. त्यावर न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख नेमली. ११ जुलैच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर या सुनावणीची तारीख चुकीची पडली होती. ती सोमवारी सायंकाळी दुरुस्त करण्यात आली. शासनाच्या म्हणण्यावर याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रामदास सब्बन यांचा युक्तिवाद होणार आहे. गुडेवारांच्या बदली प्रकरणावर उच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. तेव्हापासून जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे पदभार आहे. यामुळे महापालिकेची महत्त्वाची कामे खोळंबली गेली आहेत. अर्थसंकल्पीय सभा झालेली नाही. कामाचे टेंडर, बिले मंजुरीची कामे प्रलंबित राहिली आहेत. आता सुनावणी लांबल्यामुळे कामाचा भार वाढत जाणार, अशी चिन्हे दिसत आहेत.