यावेळी प्रशासन अधिकारी सयाजी बागल उपस्थित होते. प्रास्ताविकातून बंडू शिंदे यांनी तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा,थेरपी सेवा याविषयी मार्गदर्शन केले. दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने आठवड्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी व पालक यांच्या ऑनलाईन पद्धतीने स्पर्धाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांंगितले. यावेळी दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी सर्व केंद्रप्रमुख,विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित कसबे यांनी तर आभार संजय काशीद यांनी मानले. याकामी विशेष तज्ज्ञ दीपाली माळी, विशेष शिक्षक प्रवीण भांगे, अरुण गायकवाड, अजित काळे, अभिजित वाणी, वैशाली पडवळ, योगिता क्षीरसागर व कौशल्या माने यांनी परिश्रम घेतले.
-----०३कुर्डूवाडी-दिव्यांग