याप्रसंगी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, नगरसेवक भैया बारंगुळे, शरद फुरडे, कय्युम इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चौंडेश्वरी देवीच्या मंदिराचे भूमिपूजन आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाल्याची आठवण समाजाचे अध्यक्ष काशीनाथ कांबळे यांनी करून दिली. त्यानंतर, बोलताना चेअरमन रणवीर राऊत यांनी मंदिर निर्माण कार्याला गती देण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष तांबोळी यांनीही नगरपालिका लागेल ती मदत करेल, असे म्हटले. यावेळी मयूर गलांडे, कोविड योद्धा अभय बसाकरे, दत्तप्रसाद सोनटक्के यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी, मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसाद आणि महिलांचा हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रमही घेण्यात आला. समाजातील ज्येष्ठ असलकर, कांबळे, ढवळशंक, मन्मथ गलांडे, वाघवकर, बसाकरे, नागनाथ टेके, तारळकर यांसह समाजबांधव उपस्थित होते.
------