काळासोबत चालत असताना शरीर तंदुरुस्तीबाबत आपल्या समाजात उदासीनता आली आहे. ती दूर करण्यासाठी फिट इंडिया या चळवळीला एका उत्सवरूपात साजरी करण्याची आवश्यकता आहे. या स्पर्धेचे उद्घाटन स्कूलचे चेअरमन नितीन इंगवले-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य पी. एस. जॉर्ज, प्रशासकीय अधिकारी बी. एन. याबाजी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मिनी मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना चेअरमन नितीन इंगवले-देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. मुलींच्या गटात सईराजे देशमुख (प्रथम), मधुरा पवार (द्वितीय), प्रणाली निकम (तृतीय), मुलांच्या गटात रोहित थोरात (प्रथम), करण जाधव (द्वितीय), आदित्य सावंत (तृतीय), स्टाफ गटात तुषार बनकर (प्रथम), उमेश शिकारे (द्वितीय), महादेव मडके यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यासाठी क्रीडा शिक्षक उमेश शिकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.