शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सतर्क शेतकऱ्यांना मिळाली विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST

यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ झाली. मात्र जोमात आलेली खरीप पिके ...

यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ झाली. मात्र जोमात आलेली खरीप पिके सतत पाऊस पडत राहिल्याने नुकसानीत सापडली. त्यातच अतिवृष्टी झाल्याने पिके वाहून गेली. चांगला पाऊस पडल्याने यावर्षी दोन लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी एक लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविम्याची रक्कम भरली होती. शेतकरी हिस्सा १० कोटी ३५‍ लाख तसेच शासन हिस्स्यासह विमा कंपनीकडे १२० कोटी १५ लाख रुपये जमा झाले होते.

अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले असेल तर शासन व विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर, मेलद्वारे व लेखी अर्ज देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. त्यावेळी ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ४१ हजार ४२ शेतकऱ्यांना ३४ कोटी ७७ लाख रुपये विमा कंपनीने दिले आहेत. पात्र असलेल्या ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर आहेत, मात्र शासन हिस्सा जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पैशाची वाट पहावी लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे सजगपणे ( सर्तक) तक्रार नोंदविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे दिले मात्र विमा भरूनही अतिवृष्टीनंतर तक्रार नोंदविण्यासाठी गाफील राहिलेल्या सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर मदत अवलंबून आहे.

-----

२३८४ पीक कापणी प्रयोग

खरीप हंगामातील सर्वच पिकांचे २३८४ पीक कापणी प्रयोग करण्यात येत आहेत. त्यापैकी १९१६ प्रयोगाचे अहवाल शासन व विमा कंपनीकडे गेले आहेत तर ४६८ अहवाल अद्याप गेलेले नाहीत. हे अहवाल गेल्यानंतर व अहवालात नुकसान किती दाखविले यावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अवलंबून आहे, तूर व भुईमुगाचे पीक कापणी अहवाल पेंडिंग असल्याचे सांगण्यात आले.

---

दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा आमच्या तालुक्यातील शेतकरी भरतात. मात्र विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जाते. यावर्षी सर्वच पिके मातीसह वाहून गेली, मात्र सरकार व विमा कंपनीने अद्याप कसलीही आर्थिक मदत दिली नाही.

- बाळासाहेब पाटील,

माजी पंचायत समिती सदस्य

----