शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

टिपर व पोकलेनमधून डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST

याबाबत अक्षय दशरथ चव्हाण (वय २४, चालक, सावडी, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बार्शी ते उस्मानाबाद ...

याबाबत अक्षय दशरथ चव्हाण (वय २४, चालक, सावडी, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बार्शी ते उस्मानाबाद नारीवाडी शिवारात काम सुरू असून, दिवसभर काम अन् रात्री सिद्धाराम म्हेत्रे मतिमंद शाळा येथील मैदानात वाहने मी व पोकलेन ड्रायव्हर अब्दुल नौशाद शेख असे दोघेजण ६ जुलै रोजी रात्री दहा वाजता झोपलो असता पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने धरून मारहाण करून टिपरमधील व शेजारी उभा असलेल्या पोकलेन मशीनमधील डिझेल अंदाजे दीडशे लिटर चोरी केली. शिवाय एक मोबाईल दहा हजार रुपये व डिझेलची किंमत अंदाजे १४ हजार चारशे रुपये असा एकूण २४ हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

पांगरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांना झालेल्या प्रकाराची फोनद्वारे माहिती कळवली. तेव्हा नारीवाडी ते नारी गावातील नागरिकांनी हा टेम्पो अडविला असता त्याची विचारपूस करीत असताना पाच व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यावेळेस पोलीस गाडी आलेली पाहून टेम्पो तेथेच सोडून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत काही सूचना दिल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश चौगुले, पांडुरंग मुंढे, सुनील बोधनवाड, विनोद बांगर, मनोज जाधव, सुनील शिंदे व सुळे नारी व नारी वाडीतील नागरिकांनी ही कामगिरी केली. पुढील तपास सपोनि सुधीर तोरडमल करीत आहेत.

---