शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याच्या डोळ्यादेखत वाहनाने नेले ५० फूट फरफटत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:37 IST

पंढरपूर : पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी व व्यायामासाठी निघालेल्या स्वत:च्या काका व काकूला चारचाकी वाहन ५० फूट फरफटत नेत ...

पंढरपूर : पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी व व्यायामासाठी निघालेल्या स्वत:च्या काका व काकूला चारचाकी वाहन ५० फूट फरफटत नेत असल्याचे चित्र पाहण्याची वेळ अजिंक्य नामदेव बारले या पुतण्यावर आली. ही घटना मंगळवारी (दि. १५) पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. यामध्ये जयश्री बारले यांचा मृत्यू झाला आहे.

पंढरपूर येथे प्रकाश बारले यांचा २० वर्षापासून विठ्ठल दर्शन मंडप परिसरात प्रासादिक वस्तू विक्रीचं दुकान आहे. प्रकाश आदिनाथ बारले (वय ५४) व जयश्री प्रकाश बारले (वय ५०, दोघे रा. गोविंदपुरा, पंढरपूर) हे चंद्रभागा नदीच्या पलिकडे ६५ एकर परिसरात व्यायमासह फिरण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. त्यांच्याबरोबर अजिंक्य नामदेव बारले (वय ३३) व स्मिता अजिंक्य बारले (वय ३०) हे दोघेही त्यांच्या दुचाकीवरून जात होते. दोन वाहनांमध्ये १५ ते २० फूट अंतर होते. ते चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावरील मध्यावर आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बिगरनंबरच्या चारचाकी वाहनाने अजिंक्य बारले यांच्या वाहनाला कट मारून समोरील प्रकाश बारले यांच्या दुचाकीला धडक दिली. अन्‌ क्षणातच जयश्री यांना काळाने ओढून नेले. त्या जागीच गतप्राण झाल्या. पती प्रकाश यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना सोलापूरला उपचारासाठी नेले आहे. त्याच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

तरी त्यांना आली नाही दयाप्रकाश बारले यांच्या वाहनाला धडक देणाऱ्या वाहनामध्ये थोडी वाळू, खोऱ्या व पाट्या आढळून आल्या. धडक दिल्यानंतर प्रकाश व जयश्री हे दोघे गंभीर जखमी झाल्याचे पाहूनही त्या ठिकणच्या लोकांनी धडक देणाऱ्या त्या व्यक्तींना त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करा, अशी विनंती केली. मात्र चारचाकीतील व्यक्तींना जराही दया आली नाही. त्यांनी तत्काळ तेथून पळ काढला.

अनेकांना झाला असता धोका

चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावर गोविंदपुरा, आंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी व प्रदक्षिणा मार्ग आदी परिसरातील नागरिक पहाटे फिरण्यासाठी येतात. यामुळे नवीन पुलावर दररोज पहाटेच्या वेळी गर्दी असते. त्याचवेळी त्याठिकाणावरून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने जातात. प्रकाश बारले यांचा अपघात झाला यावेळीदेखील पुलावर गर्दी होती. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात पडला होता. मात्र सुदैवाने कोणालाही कसलीच इजा झाली नाही.