शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या भक्तनिवासात ‘व्हीआयपीं’चा कब्जा

By admin | Updated: July 3, 2017 10:53 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर : सचिन कांबळेपंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गोरगरीब भाविकांच्या राहण्याची सोय अल्पदरात व्हावी. या हेतूने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या भक्तनिवासांवर ऐन आषाढी यात्रा कालावधीत व्ही.आय.पी.नीं डाका टाकल्याने सर्वसामान्य भाविकांच्या निवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भक्तनिवासात त्यांना अल्पदरात जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांना खासगी लॉजकडे नाईलाजास्तव मोठ्या रकमा मोजाव्या लागत आहेत.शहरात वर्षाकाठी भरणारे चार यात्रा सोहळे याशिवाय वर्षभर विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कोट्यवधींच्या घरात असते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक सर्वसामान्य गरीब म्हणून परिचित आहेत. त्यांना पंढरपुरातील खासगी लॉज व अन्य निवासासाठी मोठी रक्कम मोजणे शक्य नसल्याने विठ्ठल मंदिर समितीने वेदांत, व्हिडीओकॉन भक्तनिवास ही निवासस्थाने स्वत:च्या खर्चातून व देणगीदारांच्या मदतीने भव्य स्वरुपात उभारलेली आहेत. या निवासस्थानातील खोल्या सर्वसामान्य भाविकांना अल्पदरात दिल्या जातात.मात्र आषाढी यात्रा सोहळ्यामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर समितीच्या तिन्ही भक्त निवासस्थानांमध्ये मागणी करूनही खोल्या उपलब्ध नसल्याचे मार्मिक उत्तर ऐकावयास मिळत आहे. सर्वसामान्य भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानामध्ये व्ही.आय.पी. साठी तब्बल ६४ रुम बुक करण्यात आल्याचे मंदिर समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.-------------------ते व्ही.आय.पी. कोण ?आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळांतील त्यांचे कॅबिनेट व राज्यमंत्री दर्जाचे सहकारी, अनेक सहकारी, शासकीय अधिकारी असा लवाजमा असतो. त्यांच्यासाठी बांधकाम विभागाच्या निवासस्थानासह जिल्हा परिषद, वीज वितरण, पाटबंधारे आदीच्या शासकीय निवासस्थानांमध्ये सोय केलेली असते. याशिवाय त्या-त्या पक्षांचे स्थानिक कार्यकर्त्यांचे अलिशान बंगले, फार्महाऊसमध्ये या मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची बडदास्त असते. असेल तर मंदिर समितीच्या गरिबांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांवर ६४ रुम कोणत्या व्ही.आय.पी. साठी बुक करण्यात आल्या आहेत. हा प्रश्न अधांतरी आहे. त्यामध्ये कोण राहणार हे जाहीर करण्यास मंदिर समितीचे कर्मचारी तयार नसल्याने समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण झाले आहे.