शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
2
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
3
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
4
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
5
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
6
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
7
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
8
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
9
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
10
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
11
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
12
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
13
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
14
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
15
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
16
AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?
18
Lunar Eclipse: येत्या ८ वर्षात तब्ब्ल २० चंद्रग्रहण, पण सगळीच भारतातून दिसणार का? वाचा!
19
वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार
20
बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...

बसस्थानकाचे लूक बदलणार !

By admin | Updated: September 23, 2014 14:14 IST

आरामदायी बाकडे, विद्युतीकरण आणि समोरचा भाग आकर्षक करण्यात येणार असून, यासाठी ६४ लाख ६३ हजारांची तरतूद केल्याने आता सोलापूर बसस्थानकाचे लूक बदलणार आहे.

जगन्नाथ हुक्केरी ■ सोलापूर

मोडके—तोडके बाकडे, परिसरातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांतून वाहणारे घाण पाणी, दुर्गंधी आणि अंतर्गत विभागातील अडचणी, लोंबकळत असलेल्या वायरी हे पूर्वीचे सोलापूर बसस्थानकाचे रूप आता नूतनीकरणामुळे बदलणार आहे. आरामदायी बाकडे, विद्युतीकरण आणि समोरचा भाग आकर्षक करण्यात येणार असून, यासाठी ६४ लाख ६३ हजारांची तरतूद केल्याने आता सोलापूर बसस्थानकाचे लूक बदलणार आहे.
सोलापूर बसस्थानकात प्रवेश करताना घाणीच्या साम्राज्याचा सामना करतच आत प्रवेश करावा लागत होता. प्रतीक्षालयात बसण्यासाठी चांगली व्यवस्था नसल्याने प्रवाशांना जागा मिळेल तेथे बसावे लागत असे. स्पिकर आणि विजेच्या वायरीही छताला लोंबकळत होत्या. काही वायरींवरील कव्हरही निघाल्याने यापासून धोकाही अधिक होता. मात्र यासाठी दुरूस्तीचा प्रयत्न झाला नव्हता. रंग उडाल्याने भिंतींना अवकळा प्राप्त झाली होती. बसस्थानकाची ही अवकळा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री निधी मिळाला असून, यातून नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात बसस्थानकावर येणार्‍या—जाणार्‍या प्रवाशांना चांगली सोय मिळण्यास मदत होणार आहे. बाकड्यांना ग्रेनाईट बसविण्यात येणार असून, कॉलमलाही आता ग्रॅनाईट लावण्यात येणार आहे. 
बसस्थानकाला आतून व बाहेरूनही रंग देण्यात येणार असून, आगारप्रमुख, कॅशियर, चौकशी कक्ष, पोलीस मदत केंद्र, हिरकणी कक्ष, चालक—वाहकांच्या खोल्या, स्वच्छतागृहांच्याही रचनेत बदल करून नव्या पद्धतीने व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नूतनीकरण करण्यात येणार आहे. यात अंतर्गत भागातील डांबरीकरणाचाही समावेश असल्याने बसस्थानक आवारातील रस्तेही भविष्यात चकाचक होणार आहेत. डोअर, खिडक्या, विद्युतीकरण, आरामदायी सेवा करण्यासाठी बसस्थानकाची काही प्रमाणात रचना बदलून नूतनीकरण करण्यात येणार आहे. अवकळा आलेल्या भिंतींना प्लॅस्टर करून, रंगरंगोटी करण्यात येणार असल्याने भिंतीही आकर्षक दिसणार आहेत. विजेसाठी डोळ्यांना त्रास होणार नाही असे बल्ब वापरण्यात येणार आहेत. नूतनीकरणामध्ये स्वच्छता व सेवेवर अधिक भर देण्यात आल्याने प्रवाशांबरोबरच राज्य परिवहन महामार्गाच्या कर्मचार्‍यांना लूक बदललेल्या बसस्थानकामध्ये आरामात काम करणे शक्य होणार आहे. सोलापूर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी ६४ लाख ६३ हजारांचा निधी मिळाला असून, कामाला सुरूवात केली आहे. नूतनीकरण, बदल, विद्युतीकरण, डांबरीकरण ही कामे लवकर संपवून प्रवाशांना चांगली सोय देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वेळेत हे काम पूर्ण होणार आहे.
— शशिकांत उबाळे,
विभागीय अभियंता, राज्य परिवहन महामंडळ ..यामुळे उशीर
 ■ सोलापूर बसस्थानकाच्या नूतनीकरणाला डिसेंबर २0१३ रोजी मंजुरी मिळाली असून, तांत्रिक अडचणीमुळे या कामाला उशिरा झाला आहे. दरम्यान ठेकेदारांनीही काम चांगले करण्यासाठी मुदतही वाढवून मागितली होती. आता लांबलेल्या कामाला सुरूवात झाली असून, लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. ..अशी आहे तरतूद 
■ बसस्थानक नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री निधीतून ६४ लाख ६३ हजारांचा निधी मिळाला असून, नूतनीकरण ४९ लाख ६३ हजार, डांबरीकरण १0 लाख, विद्युतीकरण ५ लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. आता कामाला सुरूवात झाली असून, नूतनीकरण झाल्याने विद्युतीकरणाचे काम करून, रंगरंगोटी करण्यात येणार आहे.