शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन डिकसळचा पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST

भीमा नदीवर असलेला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या डिकसळचा पूल धरणातील पाणी ...

भीमा नदीवर असलेला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या डिकसळचा पूल धरणातील पाणी मायनसमध्ये गेल्याने उघडा पडला आहे. बुधवारी सकाळी करमाळा तालुक्यातील टाकळी, कोंढारचिंचोली व कात्रज भागातील कार्यकर्ते सुहास गलांडे व डॉ. गोरख गुळवे ,नागनाथ लकडे यांनी पश्चिम भागातील काही नागरिकांसह समक्ष जाऊन पाहणी केली असता त्यांना ही गोष्ट निदर्शनास आली.

ज्या बाजूला दगड निखळले आहेत. त्याच्यावरती पुलावर दगड टाकून तो रस्ता त्या बाजूला वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पुलाचे दगड ज्या बाजूने निखळले आहेत. त्या बाजूने वाहतूक करू नये असे आवाहन केले आहे.

डिकसळ पूल ब्रिटिशकालीन असून, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिटही झाले आहे. भीमा नदीवरील हा पूल सोलापूर व पुणे, अहमदनगर या तीन जिल्ह्याला जोडणारा असून या पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. याशिवाय साखर कारखाने सुरू असताना या पुलावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणारी वाहने ये-जा करतात.

पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत करमाळा तालुक्यातील कोर्टी ते टाकळी रस्ता चांगला झाल्यामुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील सर्व वाहने या पुलावरून पुण्याला जातात. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

---

१९करमाळा-डिकसळ पूल

डिकसळ पुलाचे वरील भागातील दगड निखळल्याचे दिसत आहे