शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

वधू-वरांवर अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव

By admin | Updated: December 16, 2014 00:41 IST

गडहिंग्लजमध्ये नवा सामाजिक अध्याय : प्रथमच महिलांनी लावला विवाह

रवींद्र येसादे- उत्तूर -सनई-चौघडा, पै-पाहुण्यांची रेलचेल, आगत-स्वागत, लिंगायत धर्म संस्कृती अनुसार बसवेश्वर महाराजांनी घालून दिलेल्या रूढी, परंपरेनुसार उत्तूर (ता. आजरा) येथील डॉ. भालचंद्र तौकरी यांच्या चिरंजीव व कन्या यांच्या विवाह सोहळ्यातील कार्यक्रम महिलांनीच पूर्ण केला. गडहिंग्लज येथील गणेश मंगल कार्यालयात डॉ. समीर यांचा विवाह डॉ. सारिका (रा. हिसूक वडगाव, जि. बीड) हिच्याशी, तर कन्या चि. सौ. का. सम्रीता हिचा विवाह चि. ओमकारेश्वर बटकडली (रा. आजरा) यांच्यासोबत विधीवतपणे साजरा करण्यात आला.संपूर्ण लग्नविधीचा कार्यक्रम महिलाच करणार असल्यामुळे विवाहाला एक वेगळेपण होते. विवाहाची पद्धत कशी असणार याची माहिती पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांना उत्सुकता होती.लग्नसमारंभ कसा असावा, अक्षता का नको, अन्नाची नासाडी न करता फुलांचा वर्षाव का करावा याबाबतची माहिती महिला प्रदेश काँगे्रस कमिटीच्या उपाध्यक्ष सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके , चि. यश आंबोळे यांनी आपल्या अनुभवातून माहिती दिली.म. बसवेश्वरांनी लग्नाची पद्धत कशी असावी, स्त्री-पुरुष समानता कशी असावी, याबाबतची माहिती धारवाडच्या बसव केंद्राच्या सविता नडकट्टी यांनी दिली व भगिनी मंडळींनी म. बसवेश्वरांवरील गीते, दोहे यातून नातेवाइकांना संदेश दिला.सकाळी ११.३० पासून विधीला सुरुवात झाली. लग्नमंडपातील सर्व विधी पार पडल्यानंतर १ वाजता विवाहस्थळी वधू-वरांना बोलावण्यात आले. कल्याण महोत्सवाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कल्याण महोत्सवासाठी वधू-वर येत असताना त्यांचे स्वागत करण्यात आले. मंडपात आल्यानंतर शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या अतिथींनी जोरदार स्वागत केले.वधू-वरांकडून म. बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून कल्याण महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. प्रथम वधू-वरांनी वचन प्रार्थना घेतली. पती-पत्नीने कसे वागले पाहिजे, संसार कसा केला पाहिजे हे वदवून घेतले. त्यानंतर गौरव समर्पण, आशीर्वचन, भावोदक सिद्धता आणि प्रोक्षण विभुती धारणा, रूद्राक्षधारणा, वचनगंठण, प्रतिज्ञावचन, वचनमांगल्य व रूद्राक्षमांगल्यधारणा आदी विधी महिलांनी पूर्ण केल्या.विवाहस्थळी ८ मंत्रांचा उच्चार करून अक्षताऐवजी वधू-वरांवर फुलांचा वर्षाव आई-वडिलांकडून करण्यात आला. त्यानंतर वधू-वर स्टेजवरून खाली आल्यानंतर सर्वांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.या साऱ्या कामाचे सूत्रसंचालन जयश्री तोडकर, अशोक भोईटे यांनी केले. या आगळ्या-वेगळ्या विवाह सोहळ्यास आजरा, गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव, कोल्हापूर आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाहास अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, जि.प.सदस्य उमेश आपटे, वसंतराव धुरे, अशोक चराटी, अनंतराव आजगावकर, बी. जी. पोतदार आदींसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता हरिद्रालेपण हा विधी झाला.५सर्व विधी मराठीतूनच !विवाह सोहळ्यातील सर्व विधी मराठी भाषेतून झाले. क्रियाविधी करणाऱ्या या महिला कर्नाटकातील धारवाड येथील होत्या. त्यांनी मराठी भाषा समजून घेऊन विधी शांततेत पार पडला.गडहिंग्लज येथे डॉ. समीर व डॉ. सारिका आणि सम्रीता व ओमकारेश्वर बटकडली या नवविवाहितांच्या हस्ते ध्वजारोहण करून विवाहसोहळ्याचा प्रारंभ झाला.