शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

महादेव कोळी समाजाला तात्काळ दाखले द्यावेत, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 14:30 IST

सोलापूर दि २३ : पंढरपूर शहरातील महादेव कोळी समाजाला क्षेत्राचे बंधन घालून अनुसूचित जमातीचे दाखले नाकारता येणार नाही, त्यांना तत्काळ दाखले देण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. सोनक व शंतनु केमकर यांच्या खंडपीठाने दिले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : पंढरपूर शहरातील महादेव कोळी समाजाला क्षेत्राचे बंधन घालून अनुसूचित जमातीचे दाखले नाकारता येणार नाही, त्यांना तत्काळ दाखले देण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. सोनक व शंतनु केमकर यांच्या खंडपीठाने दिले. पंढरपुरातील वैशाली चंद्रकांत अधटराव, वर्षा चंद्रकांत अधटराव व अन्य जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महादेव कोळी समाज हा आदिवासी असून, पंढरपूर किंवा सोलापूर जिल्हा हा आदिवासी क्षेत्रात मोडत नसल्याचे कारण सांगून पंढरपूरच्या उपविभागीय दंडाधिकाºयांनी त्यांना महादेव कोळी अनुसूचित जमातीचे दाखले देण्यास नकार दिला होता. त्यांच्या या आदेशाविरुध्द अधटराव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ३ मार्च १७ रोजी जयवंत दिलीप पवार विरुध्द महाराष्टÑ शासन या खटल्याचा पुरावा देण्यात आला होता. या निकालामुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी महादेव कोळी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्टÑ कोळी समाज संघटनेचे पश्चिम महाराष्टÑ अध्यक्ष पंचप्पा हुग्गे व मुख्य संघटक लक्ष्मण कोळी, जिल्हाध्यक्ष संजीव कोळी, महिला अध्यक्षा कमलताई ढसाळ, सुरेखा कोळी, भारती कोळी, शहराध्यक्ष गणेश कोळी आदींनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन दाखले त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.