आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : फेरफार रजिस्टरला घेतलेल्या नोंदी प्रमाणित करण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाºयांस सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ संजय बाबुराव फिरमे (वय ४६, मंडल अधिकारी, सदाशिवनगर, ता़ माळशिरस) असे लाच घेतलेल्या अधिकाºयाचे नाव आहे़ तक्रारदार तलाठी यांनी फेरफार रजिस्टरला घेतलेल्या नोंदी प्रमाणित करण्यासाठी मंडल अधिकारी संजय फिरमे यांनी १५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही लाच सदाशिवनगर कार्यालयात स्वीकारताना मंडल अधिकारी फिरमे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर पथकाने केली़ याप्रकरणी फिरमे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़
लाच स्वीकारताना मंडल अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 15:49 IST