बार्शी : उडान फाऊंडेशनच्यावतीने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे घेण्यात आलेल्या शिबिरात २७२ जणांनी रक्तदान केले. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे हे रक्तदान शिबिर पार पडले. सर्व रक्तदात्यांचे उडान फाऊंडेशनने आभार व्यक्त केले.
उडान फाऊंडेशन ही सामाजिक संघटना गेल्या सात वर्षांपासून रक्तदान शिबिरे राबवित आहे. भगवंत ब्लड बँकच्या माध्यमातून ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे, गणेश जगदाळे, काझी यांनी परिश्रम घेतले. या शिबिरास माजी आमदार दिलीप सोपल, भाऊसाहेब अंधळकर, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णाराज बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी या शिबिरास भेट दिली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, जफर शेख, सल्लागार इन्नुस शेख, शब्बीर वस्ताद, सचिव जमील खान, कार्याध्यक्ष शकील मुलाणी, खजिनदार शोहेब काझी, रॉनी सय्यद, ॲड.रियाज शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, मोईन नाईकवाडी, सकलेन पठाण, बाबा शेख, इकबाल शेख, इरफान बागवान, हाजी अस्लम
येडशिकर, जिलानी शेख, मुन्ना बागवान, आयुब शेख, मुजमिल जवळेकर, तोसिफ बागवान, जमीर तंबोली, सादिक काझी, वसीम मुलाणी, अल्ताफ शेख, रियाज बागवान, अल्ताब शेख, जावेद शेख, मोहसीन दिल्लीवाले, जमीर भाई, एजाज शेख, राजू शिकलकर यांनी परिश्रम घेतले.