शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील निर्णयाविरोधात काळी फीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:23 IST

वडवळ: पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांनाच पदोन्नती देऊन भरण्याकरिता निर्णय न ...

वडवळ: पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांनाच पदोन्नती देऊन भरण्याकरिता निर्णय न घेता पदोन्नतीतील आरक्षित पदे खुल्या प्रवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याच्या शासन निर्णयाविरोधात राज्यात काळी पट्टी बांधून निषेध करण्यात येणार असल्याची माहिती प्रोटॉन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे यांनी दिली

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी शासनास पत्रव्यवहार करून मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्या आरक्षित पदाविषयी आग्रही मागणी करण्यात आली होती.

मात्र, ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाने संपूर्ण पदोन्नतीमधील आरक्षणाची प्रक्रिया खुल्या प्रवर्गातून करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्या संविधानिक अधिकारावर ही गदा आली. जातीयवादी षड्‌यंत्र रचून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर हा मोठा अन्याय केला आहे. याचा तीव्र निषेध १९ मे रोजी राज्यात काळी फीत लावून करणार असून, कोरोना महामारीच्या काळात शासन कोरोना परिस्थितीचा आधार घेऊन वाटेल ते निर्णय घेऊ शकत नसून, रस्त्यावर उतरून आंदोलन करताना कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीची लागण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

या निवेदनावर संघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र इंगोले, कार्याध्यक्ष किशोर शिंदे, महासचिव राजेंद्र राजदीप यांच्या सह्या आहेत.