शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील राष्ट्रवादीच्या एल्गार मोर्चाने भाजपाची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 15:15 IST

भाजप सरकारची पोलखोल करणारी फलकबाजी  व  निषेध करत तसेच भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट एल्गार मोर्चा काढून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, इंधन दरवाढ, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, गॅस दरवाढ, हेच का मोदी सरकारचे अच्छे  दिन,  सोलापुरातील मिनी आणि मेजर गाळेधारकांना रेडीरेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी करावी,  सध्याचे गाळे त्यांना कायमस्वरूपी विकत देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूरकरांनी सुरु असलेली फसवणूक, आरोग्य सेवेचा उडालेला   बोजवारा  आदी भाजप सरकारची पोलखोल करणारी फलकबाजी  व  निषेध करत तसेच भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट एल्गार मोर्चा काढून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला़राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली या लक्षवेधी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़सकाळी अकरा वाजता चार हुतात्मा पुतळा येथून मोचार्ला प्रारंभ झाला़ हा मोर्चा चार हुतात्मा पुतळा, आंबेडकर चौक, सिद्धेश्वर प्रशाला, मार्केट चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर  झाले़  प्रभारी निवासी जिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना मोर्चातील एका शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले़यावेळी  माजी महापौर जनार्दन कारमपुरी,सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर,माजी गटनेते पद्माकर काळे , प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे , सेवादलाचे  अध्यक्ष चंद्रकांत पवार , महिला जिल्हा निरीक्षक निर्मला बाविकर, नगरसेविका सुनिता रोटे ,लता ढेरे,बिस्मिल्ला शिकलगर, सुवर्णा जाधव ,मंगला कोल्हे,रेखा सपाटे, मनीषा नलावडे , सुनंदा साळूंखे ,  प्रा.श्रीनिवास कोंडी,आनंद मुस्तारे ,  मनोज गादेकर,दीपक राजगे,शंतनू साळुंखे, ध्यानेश्वर सपाटे,पिरअहमद शेख,युवराज राठोड,राम साठे,गणेश पाटील,विजय भोईटे,सिकंदर गोलंदाज,अमीर शेख,हरिदास गायकवाड, प्रशांत बाबर , चिंतामनी सपाटे,डॉ.बसवराज बगले, जनार्दन बोराडे, जावेद खैरदि , प्रमोद भोसले , दिनेश शिंदे , सिकंदर गोलंदाज , व्यापारी असोसिएशनचे अशोक मुळीक , राजू आहुजा,राजू राजानी, विशाल देढीया,राजू पत्की,अनिल पानसे , युवराज माने ,  विलास लोकरे ,शाम गांगर्डे,राम पवार,किरण वाघमोडे,मनीषा माने, आदी  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .