शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:12 IST

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर २०१९ ला ते अपक्ष ...

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर २०१९ ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही निवडणुकीत त्यांना जवळपास ६० हजार मते पडली होती. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपाकडून आ. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठांनी परिचारक यांना थांबविण्यात यश मिळविले आहे.

आमदार परिचारक गटाने समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याचे मान्य करीत पंढरपूर शहरासह २२ गावांतून मताधिक्य देण्याचा शब्द पक्षश्रेष्ठींना दिला आहे. त्यामुळेच आवताडेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून भालके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आघाडीमध्ये फूट पडली असून, शिवसेना व स्वाभिमानीने बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, अभिजित बिचकुले यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे.

आवताडेंसाठी मंगळवारी मोठे नेते पंढरपुरात

परिचारक-आवताडे यांचे मनोमिलन करण्यात यश मिळाल्यानंतर समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री विजय देशमुख, सुभाष देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील आ. प्रशांत परिचारक, आ. राजा राऊत यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या हेलिपॅडशेजारील श्रेयस पॅलेस कार्यालयात मेळावा होण्याचीही शक्यता आहे. ते कार्यालय बुकिंग केल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.