शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची प्रणाली म्हणून मान्यता मिळणार

By appasaheb.patil | Updated: January 19, 2023 15:07 IST

३० हजार डॉक्टरांना दिलासा मिळणार; तपासणी व पडताळणी कमिटीचे आरोग्य विभागास ना-हरकत पत्र सादर

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून औषधांची प्रणाली मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो डॉक्टरांच्या कार्याला यश मिळत असतानाचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची प्रणाली म्हणून मान्यता मिळणार आहे. यासाठीची कमिटीद्वारे होणारी पडताळणी पूर्ण झाली असून, कमिटीने मान्यता देण्यासंदर्भात आरोग्य विभागास ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे सांगण्यात आले.

इलेक्ट्रो होमिओपॅथीला सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने प्रचार, प्रचार व संशोधनास मान्यता दिली होती. त्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांनी इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची मान्यता देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून केंद्राने एक कमिटीची स्थापना केली. या कमिटीला संपूर्ण अभ्यास व पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर कमिटीने पडताळणी करून आरोग्य विभागास अहवाल सादर केला असून, यात इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची मान्यता देण्यास काही हरकत नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्याची प्रत आरोग्य मंत्रालयाचे संचालक डॉ. आर. मीना, आयुष मंत्रालयाचे सेक्रेटरी, डिपार्टमेंट ऑफ लिगल अफ्रेअर्सचे सेक्रेटरी, नीति आयोग, नॅशनल मेडिकल कमिशन व आय. डी. सी. मेंबर यांना पाठविले आहे.

३३ हजार डॉक्टरांना दिलासा मिळणारइलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यातील ३३ हजार डॉक्टरांना दिलासा मिळणार आहे. कमी पैशात चांगला उपचार (हार्बल) लोकांना मिळणार असून त्यातून गरिबांची सेवा होणार आहे. राज्यात ५ ते १० महाविद्यालये असून, ३३ हजारांहून अधिक डॉक्टर सध्या इलेक्ट्रो होमिओपॅथीद्वारे उपचार करीत असल्याचे डॉ. संतोष राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

इलेक्ट्रो होमिओपॅथीला औषधाची मान्यता मिळणार आहे. त्यासंदर्भातील सर्व पडताळणी, निर्णय व चर्चा झाली आहे. दरम्यान, लवकरच याबाबतचे बिल पास होणार आहे. मान्यता देण्यासंदर्भातील सर्व निर्णय आरोग्य विभागाला कमिटीने कळविले आहेत.डॉ. एम. के. एम. शेखअध्यक्ष, ॲमिथिस्ट सोशल ॲन्ड हेल्थ इन्स्टिट्युशन, सोलापूर

टॅग्स :medicineऔषधं