शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ गुरूवारी सोलापूर बंदची हाक; सकल मराठा समाज आक्रमक

By appasaheb.patil | Updated: September 24, 2024 14:22 IST

सकल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, सगेसोयरेसह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या ८ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जीवाची पर्वा न करणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन, पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या बंदमध्ये शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, व्यापारपेठा, बाजारपेठां, दुकाने, खासगी वाहतूक सेवांचा सहभाग असणार आहे. 

सकल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, सगेसोयरेसह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या ८ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. परंतु शासनाने त्यांची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षांकडून मराठा व ओ.बी.सी. यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडवण्याचे कारस्थान सत्ताधारी करत आहेत.

 याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरु करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस माऊली पवार, राजन जाधव, विनोद भोसले, आप्पासाहेब सपाटे, महादेव गवळी, प्रकाश ननवरे, विलास लोकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील