शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये मोठी कपात; २४९ पैकी केवळ ११८ जागांवरच होणार प्रवेश

By appasaheb.patil | Updated: January 29, 2023 16:23 IST

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता राज्य शासनाने आयुर्वेद एमडी, एमएस प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी भावी डॉक्टरांनी 'लोकमत'शी बोलताना केली आहे.

सोलापूर : राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये कपात केल्याची माहिती उघडकीस आली आहे. प्रावीण्यप्राप्त तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे अन्याय होणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता राज्य शासनाने आयुर्वेद एमडी, एमएस प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी भावी डॉक्टरांनी 'लोकमत'शी बोलताना केली आहे.

विद्यार्थ्यांची चूक नसताना पदवी प्रवेशप्रक्रियेसाठी ६ महिने लागले आणि प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची टर्म सहा महिने पुढे ढकलण्यात आली. असे केवळ महाराष्ट्र राज्यात झाले. कोरोनामुळे ४ महिने उशिरा घेण्यात आली. अशा तऱ्हेने या बॅचने एकूण ५ वर्षांत पूर्ण होणारी पदविका जवळपास ६ वर्षांत पूर्ण केली, ते ही या विद्यार्थ्यांची कसलीही चूक नसताना दरवर्षी आंतरवासीयता प्रशिक्षणानंतर कालांतराने घेण्यात येणारी पदव्युत्तर प्रवेश परीक्षा यावर्षी (टर्म पुढे गेल्यामुळे) आंतरवासीयता प्रशिक्षणादरम्यानच आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळही मिळाला नाही. तरीही अधिकचे श्रम घेऊन विद्यार्थी पदव्युत्तर प्रवेशासाठी पात्र झाले आहे. मात्र, आता प्रवेश क्षमता कमी केल्याने विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे.

शासनाने लक्ष देण्याची मागणीमहाराष्ट्र राज्यातील आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेशाची जाहीर करण्यात आलेली पहिली यादीही दुसऱ्याच दिवशी रद्द करण्यात आली. कारण, अद्ययावत माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील या बंदी असलेल्या जागांमध्ये अजून वाढ होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आदींनी या प्रकरणात लक्ष घालून पदव्युत्तर प्रवेशाच्या अधिकाधिक जागा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

२०१६ साली महाराष्ट्र राज्यात पदवीसाठी प्रवेश घेतल्यापासून ते आता पदव्युत्तर प्रवेशापर्यंतही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि करावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांची कसलीही चूक नाही. याद्वारे महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याची भावना आम्हा विद्यार्थ्यांमध्ये आहे.- डॉ. ऋषभ मंडलेचा (सोलापूर)

टॅग्स :Medicalवैद्यकीय