शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीत बिबीदारफळ, नान्नज, कळमण, देगावची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात शेतीपंपाची सर्वाधिक थकबाकी बिबीदारफळ त्यानंतर नान्नज व कळमण येथील शेतकऱ्यांकडे असल्याचे उपकार्यकारी अभियंता संतोष ...

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात शेतीपंपाची सर्वाधिक थकबाकी बिबीदारफळ त्यानंतर नान्नज व कळमण येथील शेतकऱ्यांकडे असल्याचे उपकार्यकारी अभियंता संतोष कैरमकोंडा यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी वीज बिल भरून सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन कैरमकोंडा यांनी केले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील १३ हजार ८६ शेतकऱ्यांकडे मूळ थकबाकी १०४ कोटी चार लाख ८४५ रुपये इतकी आहे. यावरील दंड व व्याजाचे ४५ कोटी रुपये तर वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासन माफ करणार आहे. तालुक्यातील बिबीदारफळ गावात ८३० शेतकऱ्यांकडे ६६३ लाख, नान्नज येथील ८०१ शेतकऱ्यांकडे ६३५ लाख, कळमणच्या ७१५ शेतकऱ्यांकडे ६०५ लाख रुपये थकबाकी आहे. देगाव येथील ८२४ शेतकऱ्यांकडे ७०७ लाख रुपये, पाथरी येथे ५९० शेतकऱ्यांकडे ५२१ लाख, डोणगाव येथील ५८३ शेतकऱ्यांकडे ४९५ लाख, पाकणीत ४०० शेतकऱ्यांकडे ३०४ लाख, रानमसले येथील ६४४ शेतकऱ्यांकडे ५७३ लाख, मार्डी येथील ५६८ शेतकऱ्यांकडे ४०२ लाख, अकोलेकाटी ३९१ शेतकऱ्यांकडे ३२५ लाख, तिर्हे ४१५ शेतकऱ्यांकडे ३७५ लाख, हिरज ४२७ शेतकऱ्यांकडे ३३१ लाख, नंदूर ३५० शेतकऱ्यांकडे ३४६ लाख, वडाळा येथील ४३३ शेतकऱ्यांकडे २५५ लाख, बाळे येथील ३६७ शेतकऱ्यांकडे ३३४ लाख, बाणेगाव येथील ३२६ शेतकऱ्यांकडे २६८ लाख, कारंबा येथील ३६२ शेतकऱ्यांकडे २२६ लाख, कौठाळी येथील २९२ शेतकऱ्यांकडे २२९ लाख, गावडीदारफळ येथील ३११शेतकऱ्यांकडे २२६ लाख, पडसाळी येथील ३०३ शेतकऱ्यांकडे २७१ लाख, बेलाटी येथील ३०९ शेतकऱ्यांकडे २३० लाख रुपये इतकी थकबाकी आहे.

कवठे येथील २१३ शेतकऱ्यांकडे १७४ लाख, कोंडी येथील १७४ शेतकऱ्यांकडे १४८ लाख, शिवणी येथील १६५ शेतकऱ्यांकडे १४९ लाख, गुळवंची येथील २२९ शेतकऱ्यांकडे १४४ लाख, हगलूर १८९ शेतकऱ्यांकडे १५९ लाख रुपये थकबाकी आहे. यापैकी ५० टक्के रक्कम भरल्यास ५० टक्क्यांपर्यंत वीज बिल माफ होणार आहे.

--

शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळेना

उत्तर सोलापूर तालुक्यात सिद्धेश्वर, लोकमंगल व सिद्धनाथ हे तीन साखर कारखाने आहेत. याशिवाय इतरही कारखान्यांना तालुक्यातील ऊस तोडणी झाला आहे. मात्र, बिले मिळाली नाहीत. इतरही कारणे असतील. मात्र, शेतकरी वीज बिल भरण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.