शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्टी दारू विक्रीने भुरीकवठेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

अक्कलकोट : तालुक्यात भुरीकवटे येथे हातभट्टी दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रार करूनही त्यावर हालचाली ...

अक्कलकोट : तालुक्यात भुरीकवटे येथे हातभट्टी दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रार करूनही त्यावर हालचाली होत नाहीत. पोलीस कारवाई करतात; पुन्हा दोन दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती रहाते. गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

भुरीकवटे गावची लोकसंख्या जेमतेम दोन हजार. मात्र, त्याठिकाणी तब्बल सात अवैध हातभट्टी दारू विक्रीची अड्डे आहेत. गावात ज्येष्ठांसह अनेक तरुण दारूच्या आहारी गेले आहेत. यामुळे गोरगरिबांचे संसार उद‌्ध्वस्त होत आहेत. संध्याकाळ झाली की गावात दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ सुरू असतो. अनेकवेळा पोलिसांची कारवाई झाली आहे. त्यानंतर पुन्हा दोन दिवसात जैसे थे परिस्थिती निर्माण होते. कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी मागणी गिरमल बेळ्ळे, संगीता कुंभार, गुरुबाई कुंटोजी, भागीरथी बेळ्ळे या त्रस्त महिलांनी केली आहे.

--

अतिदारूमुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला. मुलगाही दारू पिऊन दररोज गोंधळ घालतो. कुटुंबाचा संसार उद‌्ध्वस्त झाला आहे. वैतागलो आहोत.

- शंकरेव्वा बेळ्ळे

महिला ग्रामस्थ

---

यापूर्वी अवैध दारू धंद्याविरोधात तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग आशा अनेक ठिकाणी दिला. त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणेवरचा विश्वास उडतो.

- जगदेवी कुंटोजी

महिला ग्रामस्थ

---

आलूरमधील सराईत गुन्हेगाराचा अड्डा

उमरगा तालुक्यातील आलूर येथील एका सराईत गुन्हेगाराने भुरीकवठेत ठाण मांडून हातभट्टी अड्डा चालवला आहे. काही व्यक्तींच्या वरदहस्तामुळे त्याने गावात येऊन दारू धंदा सुरू केला आहे. दहशत माजवली आहे. यापूर्वी त्याला उमरगा पोलिसांनी हद्दपार केले आहे. मात्र त्याने भुरीकवठेत अवैध धंद्याच्या माध्यमातून जम बसवला आहे.

-कुठे आहेत हातभट्टीची अड्डे

आलूर रस्त्या (१), एसबीआय ग्राहक सेवा परिसर (३), भीमनगर येथे (१), भुरीकवटे- वागदरी रोड (१) असे सहा हातभट्टी अड्डे सुरू आहेत. तसेच उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे. उलट पाण्याच्या बाटलीतून हातभट्टी दारू देण्याची शक्कल लढवली जात आहे.

--

यापूर्वी अनेक वेळा दारूधंद्यांवर कारवाई केली आहे. पुन्हा दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लवकरच पथकामार्फत कारवाई करून बंदोबस्त करण्यात येईल.

- विपीन सुरवसे

बीट अंमलदार