शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भालके समर्थकांकडून कार्यकर्त्याला मारहाणीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST

पोटनिवडणुकीपूर्वीच पंढरपूरमध्ये पदाधिकारी निवड व विठ्ठल कारखाना यावरून राष्ट्रवादीत मतभेद सुरू आहेत. ते वाद मिटविण्यासाठीच अजित पवार, जयंत पाटील ...

पोटनिवडणुकीपूर्वीच पंढरपूरमध्ये पदाधिकारी निवड व विठ्ठल कारखाना यावरून राष्ट्रवादीत मतभेद सुरू आहेत. ते वाद मिटविण्यासाठीच अजित पवार, जयंत पाटील पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी किरण घोडके हा अजित पवार यांना आपल्या नावावर विठ्ठल कारखान्याने परस्पर २० लाख रुपये कर्ज काढले आहे. याविषयी तक्रार देण्यासाठी आला होता. आमचा उतारा कोरा करून द्यावा, उमेदवारी देताना याचा विचार करावा, अशी मागणी हा कार्यकर्ता करणार होता. त्याआधी भालके यांच्या २० ते २५ समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला. त्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे लक्षात येताच विठ्ठलचे संचालक युवराज पाटील, दीपक पावर आक्रमक झाले. त्याचे काहीही चुकीचे नसून जाब विचारण्याचा त्याला अधिकार आहे. भविष्यात शेतकरी, कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी खपवून घेणार नसल्याचा इशारा युवराज पाटील यांनी दिला आहे. या प्रकारानंतर त्या जखमी कार्यकर्त्याला पोलीस आपल्या व्हॅनमधून घटनास्थळावरून घेऊन गेले. त्यानंतर तणाव निवळला.