शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

वारकऱ्यांचे भजन आंदोलन

By admin | Updated: August 5, 2014 23:36 IST

सांगलीत निदर्शने : पंढरपुरातील सीसी टीव्हीप्रश्नी निवेदन

सांगली : पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात नऊ कोटी रुपये खर्चून सीसी टीव्ही कॅमेरे बसवले असून, यासाठी बॅकअप, मेमरी कार्डची सोय नसल्यामुळे याचा हेतूच असफल झाला आहे. बॅकअप, मेमरी कार्ड त्वरित बसवण्यात यावे, या मागणीसाठी आज (मंगळवार) श्रीसंत सेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान, सांगलीवाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी निदर्शनेही करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व विश्वास गवळी यांनी केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; मात्र त्याला बॅकअप व मेमरी कार्ड नसल्यामुळे कॅमेरे बसवण्याचा हेतूच सफल होत नाही. वारकऱ्यांच्या व मंदिर सुरक्षेच्या कारणासाठी करण्यात आलेला हा खर्च वाया गेला आहे. एखादी घटना घडल्यास कॅमेऱ्याचे फुटेज जतन करणे आवश्यक आहे. कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण व ते जतन होण्यासाठी मेमरी कार्डची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यामुळे मंदिर सुरक्षिततेच्या दृष्टीने मदतच होणार आहे. याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पृथ्वीराज पवार, हरिदास पाटील, लक्ष्मण नवलाई, लक्ष्मण हरुगडे, विजय म्हैसकर, दत्तात्रय आंबी, दिलीप सूर्यवंशी, विजय लोळगे आदी वारकरी, भाविक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)