शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

भांबुर्डी गणात कोणाची शिजणार डाळ!

By admin | Updated: January 24, 2017 19:59 IST

भांबुर्डी गणात कोणाची शिजणार डाळ!

भांबुर्डी गणात कोणाची शिजणार डाळ!माळशिरस : तालुक्यातील भांबुर्डी या नव्याने स्थापना झालेल्या गणाची ही पहिली निवडणूक आहे. पूर्वी यातील अनेक गावे मेडद गणाला व माळशिरस गटाला जोडली होती. माळशिरस नगरपंचायत झाल्यामुळे फेररचनेत भांबुर्डी गण तयार झाला. त्यामुळे राजकीय समीकरणे बदललेली आहेत. अनेक राजकीय पक्षांनी आपल्या वेगळ्या चुली मांडायला सुरुवात केली असली तरी यात कोणाची डाळ शिजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भांबुर्डी गणात भांबुर्डीसह मोटेवाडी, जाधववाडी, सदाशिवनगर, तामशिदवाडी, पुरंदावडे, येळीव या गावांचा समावेश आहे़ हा गण मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे़ त्यामुळे सर्व पक्षांनी आता उमेदवाराची शोधमोहीम हाती घेतल्याचे चित्र आहे. भांबुर्डी किंवा सदाशिवनगर या दोन गावातील उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे.या गणातील अनेक गावे मोहिते-पाटील विरोधकांची मानली जातात. पूर्वीच्या मेडद गणात आघाडीची कायम बाजी होती. यामुळे याही वेळी आपला विजय निश्चित होणार, अशी धारणा ठेवून मोहिते-पाटील विरोधकांचे काम सुरू आहे़ असे असले तरी यावेळी गावांच्या अदलाबदली झाल्या आहेत़ त्यात मागील जि़ प़ निवडणुकीत मताधिक्यात घट झालेली आहे़ मतदारांच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत विकासकामांचा आलेख, उमेदवाराची लोकप्रियता, गटातटातील राजकारण यावर पारंपरिक विजय मिळविण्यासाठी ‘काटे की टक्कर’ द्यावी लागणार आहे.-------------------------‘युज अ‍ॅण्ड थ्रू’ची वागणूकया गणातीत सर्वांत मोठी समस्या म्हणजे प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते व मुख्य गावांना जोडणारे रस्ते होय़ मग यात सदाशिवनगर, इस्लामपूर, भांब, गिरवी, नातेपुतेसह अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ तालुक्यात वर्षानुवर्षे राष्ट्रवादी मोठी ताकद आहे़ राज्यात सत्ता होती, तरीही तालुक्याचा पश्चिम भाग विकासापासून कोसो दूर आहे़ कारण या भागातील विविध समस्यांचे गाठोडे बघायला कोणच राजी नसल्याची खंत नागरिक बोलून दाखवित आहेत़ या भागाला सर्वच पक्षांनी ‘युज अ‍ॅन्ड थ्रु’ अशीच वागणूक दिली आहे़