शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार, आचारसंहितेचा भंग कराल तर...!

By admin | Updated: January 24, 2017 19:39 IST

खबरदार, आचारसंहितेचा भंग कराल तर...!

खबरदार, आचारसंहितेचा भंग कराल तर...!सोलापूर : नावाबाबत गुप्तता राहत नसल्याने आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यास नागरिक पुढे येत नसल्याचे निदर्शनाला आल्यावर मोबाईल अ‍ॅपवर तक्रार करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध केली आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय राहत नसल्याने आचारसंहिता भंगाबाबत माहिती देण्यास कोणी पुढे येत नाहीत. याशिवाय तक्रार दिली तरी त्यावर कारवाई होण्याबाबत साशंकता निर्माण होत असल्याचे निदर्शनाला आल्यावर निवडणूक आयोगाने ही कमतरता दूर करण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. सामान्य जनतेला आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यासाठी ‘कॉप’ नावाचे (सिटीझन्स आॅन पॅट्रोल) मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे. मनपा निवडणूक कार्यालयास या अ‍ॅपचा प्रसार करून नागरिकांचा सहभाग वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कॉप हे स्मार्टफोन वापरणाऱ्यास सहजपणे डाऊनलोड करता येईल. या अ‍ॅपमध्ये मोबाईल धारकास आपले नाव गुप्त ठेवून आचारसंहिता भंग होत असलेल्या ठिकाणावरून तक्रार नोंदविता येईल. कॉपवर ही तक्रार नोंदविल्यावर घटनास्थळाच्या दोन किलोमीटर परिसरात हजर असणाऱ्या सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना तक्रारीचा तपशील मोबाईलवर प्राप्त होईल. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करायची जबाबदारी दिली गेली आहे. नागरिकांच्या हातात असलेल्या मोबाईलचा त्यांच्यावर वॉच राहणार असल्याने आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक उमेदवारावर राहणार आहे.छायाचित्राद्वारे मिळणार स्थळ४कॉप हे अ‍ॅप्लिकेशन नागरिकांना गुगल किंवा प्लेस्टोअरमधून सहजरीत्या डाऊनलोड करता येईल. आचारसंहिता भंग होत असल्याचे छायाचित्र या अ‍ॅपवर टाकल्यावर लागलीच जीपीएस लोकेशनद्वारे स्थळ व आचारसंहिता भंगाचा प्रकार समजतो. संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे या तक्रारीची माहिती मिळते. यावरून केलेली कारवाई पुन्हा त्या अ‍ॅपवर लोड केली जाणार आहे. पैसे, भेटवस्तू, दारू वाटप करताना असे छायाचित्र काढून अ‍ॅपवर टाकल्यास परिणामकारक कारवाई होणार आहे.