शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘उजनी’ने गाठला तळ

By admin | Updated: July 19, 2014 01:05 IST

धरणात वजा २६.७३ टक्के पाणीसाठा : पाणलोट क्षेत्रातील स्थिती खूपच बिकट

 बेंबळे: पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस पडलेला नाही. उजनी धरणातील पाणीसाठ्यात वरचेवर घट होत आहे. यामुळे नागरिक, उद्योजक, शेतकरी व कारखानदारांत चिंतेचे वातावरण आहे.गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उजनी धरणात केवळ उणे २६.७३ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी उजनी धरण उणे ४८ टक्क्यापर्यंत खाली आले होते. परंतु जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने उजनी धरण उणे १५.०७ टक्के झाले. यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील १८ टक्के धरणातील पाण्याची स्थिती खूपच बिकट झाली आहे.सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या भीमा खोऱ्यातील १९ धरणांची पाणीस्थिती बिकट झाली आहे. पावसाने अशीच ओढ दिली तर या तीन जिल्ह्यांवरील दुष्काळाचे सावट गडद होणार आहे. याच जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. गेल्यावर्षी धरणाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो हेक्टरवर विविध पिके, ऊस, फळबागा केल्या. मात्र पावसाअभावी पूर्ण पिकेच हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस सुरू असताना पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. उजनी धरणावरील १८ धरणांपैकी १० धरणांतील पाणीसाठा दोन अंकीसुद्धा नाही. त्यामुळे या खोऱ्यातील जनजीवन पाण्यामुळे विस्कळीत झाले आहे. राहिलेल्या दोन-अडीच महिन्यांत तरी चांगला पाऊस पडावा यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहेत. गेल्यावर्षी या तारखेला दौंड येथून उजनीत ५००० क्युसेक्स विसर्ग येत होता, मात्र आता कोठूनही विसर्ग नाही.------------------------------गतवर्षीपेक्षा यंदा स्थिती बिकटसध्या उजनी धरणात पाण्याची पातळी ४८८.७४७ मीटर तर एकूण पाणीसाठा ४९.३३ टक्के आहे. मृत साठ्यातील १४.३२ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. एकूण टक्केवारी उणे २६.७३ टक्के आहे. गेल्यावर्षी याच तारखेला उजनी धरणाची पाण्याची पातळी ४८९.८१२ मीटर होती. एकूण पाणीसाठा ५५.६४ टीएमसी होता. टक्केवारी उणे १५ टक्के होती. म्हणजेच गेल्यावर्षी उजनी धरणात आतापेक्षा सहा टीएमसी पाणी अधिक होते.