शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

फेसबुकचे आव्हान बार्शीच्या मयूरने स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

बार्शी : फेसबुकने केलेले आवाहन स्वीकारत बार्शीच्या मयूर फरताडे या युवकाने प्रायव्हसी क्रॅक केली. बदल्यात कंपनीने त्याला २२ लाखांचे ...

बार्शी : फेसबुकने केलेले आवाहन स्वीकारत बार्शीच्या मयूर फरताडे या युवकाने प्रायव्हसी क्रॅक केली. बदल्यात कंपनीने त्याला २२ लाखांचे बक्षीस दिले आहे.

भारतातील

आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र

सरकारमध्ये वाद सुरू आहे; परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा

फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगारी वृत्तीचे हॅकर्स बसले आहेत. ही बाब

कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक

शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. त्याची दखल घेत फेसबुकने त्याला 30 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले

आहे. तसा मेल त्याला पाठविला आहे.

फेसबुक २२ लाख रुपयांचे बक्षीस देणार

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरसारख्या बऱ्याच कंपन्या वापरकर्त्यांची सुरक्षा करण्यासाठी हॅकर्सपासून सतत त्यांच्या सिस्टीमचे रक्षण करतात, पण कुठेतरी ते चुकतही असतात. कंपनीच्या या चुकीमुळे

वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. फेसबुकच्या

कंपनी इन्स्टाग्राममध्ये मयूर फरताडे या मुलाला असाच एक बग सापडला, यासाठी

त्याला २२ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

इन्स्टाग्राममध्ये दोष होता

खरं तर, मयूर फरताडे याने

त्याच्या कमतरता सांगून अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यापासून फेसबुकला

वाचविले. ज्यासाठी कंपनीने त्याला बक्षीस म्हणून इतकी मोठी रक्कम

दिली. इन्स्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया

दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओजदेखील बघता येत

होते. त्याचबरोबर या पोस्टवरील लाइक्स, कमेंट्स, सेव्ह काउन्ट इतर माहितीदेखील बघता येत होती. विशेष म्हणजे, असे करण्यासाठी त्या युजरला फाॅलो

करणे आवश्यक नव्हते. पोस्टपण त्यांना विना फॉलो करता पाहू शकत होता. फेसबुक व इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती.

२१ वर्षीय मयूर फरताडेने चमत्कार केला

भारतीय विकासक मयूर फरताडे

याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून

वाचविले. 21 वर्षीय मयूर फरताडे याने सांगितले की, फेसबुकच्या प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राममध्ये एक गंभीर बग आहे, ज्याचे हॅकरने सांगितले तर लोकांचे

बरेच नुकसान होऊ शकते. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या

माध्यमातून या त्रुटीची माहिती १६ एप्रिलला दिली होती. कंपनीने १५

जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील रहिवासी असलेला मयूर हा

संगणक शास्त्राचा विद्यार्थी आहे. तो शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. मधुकर फरताडे यांचा पुतण्या आहे.

----

कोट

लॉकडाऊनमध्ये पुरेसा मोकळा वेळ होता. काहीतरी नवीन शिकायचे म्हणून वेगवेगळ्या स्विक्युरी रिसोर्सेचचे लिखाण वाचत होतो. त्यातूनच मला

इन्स्टाग्रामवर बग शोधण्याचे प्रोत्साहन मिळाले. दोन आठवडे मी नवीन फिचर्स बघून वेब ॲप आणि अँड्रॉइड ॲपवर टेस्ट करीत होतो. त्यात मला हा बग सापडला. फेसबुकचा बग bounty प्रोग्रॅम आहे. त्यामध्ये त्यामध्ये सिक्युरिटी रिसर्चेस पार्टीसिपेट करू शकतात. इथे जाऊन मी हा बग रिपोर्ट केला.

- मयूर फरताडे