शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

By admin | Updated: January 31, 2017 17:27 IST

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेग

बार्शीत गुप्त खलबताव्दारे रणनितीला आला वेगशहाजी फुरडे-पाटील - बार्शी आॅनलाईन लोकमतबार्शी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्याच हातात पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सूत्रे यावीत यासाठी गुप्त खलबताद्वारे रणनिती आखत उमेदवाऱ्या नेमक्या कोणत्या गावात, कोणाला द्यायची हे गणीत मांडत असताना राष्ट्रवादीचे आ़ दिलीप सोपल व शिवसेनेचे राजेंद्र राऊत ही नेतेमंडळी निवडणुकीसाठी जनसंपर्काबरोबरच अर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत़ त्यामुळे यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार असे दिसत आहे़ बार्शी तालुक्यात जि़प़च्या सहा तर पंचायत समितीच्या बारा जागा आहेत़ या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही झाली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाला किती जागा सोडणार हे अद्यापी दोन्ही काँग्रेसने जाहीर केलेले नाही, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससाठी जागा सोडणार की काँग्रेसच्याच उमेदवाराला त्यांच्या हातात घड्याळ बांधायला लावणार हे देखील अद्यापी गुलदस्त्यातच आहे़ गेल्या पंधरा दिवसापासून आ़ दिलीप सोपल यांनी ही निवडणुक अतिशय गांभीर्याने घेतली असल्याचे त्यांच्या हाचालीवरुन दिसून येत आहे़ इकडे शिवसेनेमध्ये देखील वातावरण कांहीसे गंभीर झाल्याचे जाणवत आहे, शिवसेनेचे माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख , पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी जिल्ह्यातील आघाडीसंदर्भात चर्चा सुरु ठेवल्याने तसेच सहकार मंत्र्यांनी देखील जिल्ह्यातील निवडणुक ही आघाडी करुन कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याने कोणत्या चिन्हावर निवडणुक लढवायची आहे, याबाबत विचारमंथन सुरु असल्याचे सांगीतलेले आहे, त्यामुळे जिल्ह्याबरोबरच तालुक्यात नेमके कोणाला कोणते निवडणुक चिन्ह मिळणार याची देखील मोठी उत्सुकता लागली आहे़ माजी आ़ राजेंद्र राऊत हे बार्शी तालुक्यात भाजपाबरोबरच युती करण्याच्या मुडमध्ये आहेत, मात्र त्यांच्या या भूमिकेबाबत अद्यापी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी होय नाही असे कांहीही सांगीतलेले नाही, त्यामुळे राऊत यांच्या या युतीच्या धोरणाला शिवसेना संमती देणार की नाही, आणि जर शिवसेनेने संमती दिली नाही तर राऊत पुढे कोणते धोरण अवलंबणार याबाबत तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहे़ या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत हे काय निर्णय घेणार यावरच या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे़ --------------------------आयाराम-गयारामकोणतीही निवडणुक म्हटले की आयाराम -गयाराम ची चलतीच असते, यंदाही निवडणुकीच्या तोंडावर नेते व कार्यकर्त्यांनी पक्ष बदलाच्या हालचाली सुरु केल्या असून अनेक कार्यकर्ते शिवसेनेतून राष्ट्रवादीतून कांही जण राष्ट्रवादीतून शिवसेनेतून प्रवेश करु लागले आहेत़ ------------------------पैसा आणि निवडणूकनिवडणूक अन् पैसा हे समीकरण तयार झाले असून निवडणूक आयोगाने कितीही काटेकोर नियम लावले तरी राजकीय पक्ष व उमेदवार कोट्यवधी रुपये निवडणुकीवर खर्च करीत असतात, त्यामुळे गरीब कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचे दिवस आता संपले आहेत, त्यामुळे दोन्ही राजकीय पक्ष हे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना किंवा ज्याठिकाणी महिला आरक्षण आहे अशा ठिकाणी अधिकारी किंवा उद्योजक असलेल्याच्या पत्नी किंवा आईला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत़ त्यामुळे नोटा बंदी असली तरी पैशाचा मात्र भरपूर चुराडा निवडणुकीत होणार हे खरे आहे़