शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बापरे..मानहानी केल्याप्रकरणी मनोज शेजवाल यांच्याविरुद्ध पाच कोटीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:14 IST

कोणी? कशासाठी व कोठे दाखल केला दावा? वाचा सविस्तर

सोलापूर: खोटे आरोप करून मानहानी केल्याप्रकरणी नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी पाच कोटी रुपये नुकसानभरपाईचा दावा मुख्य न्यायदंडाधिकारी कनकवडे यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (वय 61, रा. अवंती नगर, जुना पुणे नाका) यांनी नगरसेवक मनोज भास्कर शेजवाल (वय 47,  रा. रेल्वेलाईन, महापौर बंगल्याजवळ) यांच्याविरुद्ध क्रिमिनल प्रोसीजर कोड कलम 190 अन्वये व इंडियन पिनल कोड कलम 500,501  अन्वये पाच कोटी रुपयांचा फौजदारी खटला दाखल केला असल्याचे जिल्हाप्रमुख बरडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. शेजवाल हे शिवसेनेचे नगरसेवक असून त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यामुळे शिवसेनेने शेजवाल यांना पक्षातून निलंबित केले आहे.

तसेच शेजवाल यांच्याविरुद्ध कुंटणखाना चालवल्याचा गुन्हा दाखल असून सध्या तो न्यायप्रविष्ट आहे. शेजवाल यांनी 23 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन बरडे यांच्यावर अनेक खोटेनाटे आरोप केले आहेत. याबाबत विविध दैनिकात व वृत्तवाहिन्यावर बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. वास्तविक शेजवाल यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे.  शेजवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केवळ बरडे यांची बदनामी व्हावी, त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात यावी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा व पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपावा या हेतूने मानहानी व बदनामी केली आहे. त्यांच्या  आरोपांमुळे बरडे यांना मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे शेजवाल यांना कडक शासन अथवा शिक्षा देणे न्यायाच्या दृष्टीने गरजेचे आहे, असे बरडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खाजगी फिर्यादीत नमूद केले आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण