शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

विकासकामांच्या मुद्यांमुळे बबनराव शिंदे

By admin | Updated: October 21, 2014 13:58 IST

माढा तालुक्यातील मतदारांनी विकासाला मतदान करण्याच्या बबनराव शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९७ हजार ८0३ मते मिळविली.

इरफान शेख/अय्युब शेख■ माढा

 
माढा तालुक्यातील मतदारांनी विकासाला मतदान करण्याच्या बबनराव शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९७ हजार ८0३ मते मिळविली. ३५ हजार ७७८ इतके मताधिक्य मिळाले. अनेक विकासकामांच्या मुद्यांमुळे जनतेने त्यांना पाचव्यांदा प्रचंड बहुमताने निवडून दिले.
आ.शिंदे यांनी गेल्या २५ ते ३0 वर्षांच्या काळात जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक, जिल्हा परिषद व विधानसभेत २0 वर्षे काम करताना साखर कारखानदारी, सिंचनाचे प्रकल्प व उसाचा दर यासह अनेक क्षेत्रात केलेले काम पाचव्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या कामाला आले.
माढा मतदारसंघात आ.बबनदादा शिंदेंचा रथ रोखण्यासाठी दस्तुरखुद्द शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी करकंब येथे सभा घेतली. काँग्रेसच्या वतीने नारायण राणे व हर्षवर्धन पाटील यांनीही सभा घेतल्या; मात्र या दोघांनाही आपला मतदारसंघ ताब्यात ठेवता आला नाही, पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
सर्व विरोधकांनी आ.बबनदादा शिंदे यांनाच आपल्या प्रचारात टार्गेट केले होते. अमुक विकास झाला नाही, तमुक विकास झाला नाही असा ऊहापोह सर्वांनी केला होता. याला कसलेही उत्तर न देता केवळ विकासकामांविषयीच आपल्या प्रचारसभेत आ.शिंदे यांनी उल्लेख ठेवला. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांनाही टीकेला उत्तर देऊ दिले नाही. आपल्या विकासावर आपला विश्‍वास आहे ना मग म्हणू द्या विरोधकांना काय म्हणायचे आहे ते असे ते सांगत.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वतीने आ.बबनदादा शिंदे, शिवसेनेच्या वतीने शिवाजीराव सावंत, काँग्रेसच्या वतीने कल्याणराव काळे व भाजप पुरस्कृत दादासाहेब साठे या चारही उमेदवारांचे साखर कारखाने असल्याने जिल्ह्यातील लक्षवेधी लढत होती. उसाचा दर, खताचे वाटप, त्या माध्यमातून केली जाणारी विकासकामे हे मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले; मात्र विरोधकांना यावरही टीका करायची संधी शिंदेंनी दिली नाही.महायुतीतून शिवसेना वेगळी झाली. आघाडीत बिघाडी होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले यामुळे उमेदवारांची गर्दी झाली, तरीही आ.शिंदे यांचे मताधिक्य कमी करण्यात सर्वांना अपयश आले. काँग्रेसच्या मताचा टक्का काही प्रमाणात वाढला. काँग्रेसचे कल्याणराव काळे यांना ६२ हजार २५ मते मिळून ते दुसर्‍या क्रमांकावर राहिले तर शिवसेनेचे शिवाजी सावंत यांना ४0 हजार ६१६ मतांवर समाधान मानावे लागले. दादासाहेब साठे यांना केवळ १४ हजार १४९ मतेच मिळाली. त्यांची अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत.
सीना-माढा उपसा सिंचन योजना बबनराव शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत यशस्वीपणे चालवून दाखवली. कुंभेज- खैरावमधील सीना नदीवर पुलाचा प्रश्न ८ कोटी रुपये मंजूर करून त्यांनी मार्गी लावला. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावातील रस्त्यांचा प्रश्न पंतप्रधान सडक योजना मार्गी लावली. १४ गावाच्या घडामोडींवरही आ.शिंदे यांनी मात केली. 
 
विकासाचा मुद्दा प्रभावी
 ■ आ.बबनदादा शिंदे हे केलेली विकासकामे सांगून, उर्वरित विकासकामे मार्गी लावू असे जनतेला ठासून सांगत होते. प्रत्येक गावात त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. इतर उमेदवारांचा जनसंपर्क मतदारसंघाच्या प्रत्येक भागात त्या प्रमाणात नव्हता. त्यांनी राहिलेला विकास जनतेसमोर मांडण्याला प्राधान्य दिले. प्रत्येक उमेदवाराला आपापल्या भागात मताधिक्य मिळाले; मात्र आ.बबनदादा शिंदे यांना सर्वच भागातून आघाडी मिळाली.