शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तेराव्याचा खर्च टाळून वृध्द, मुकबधिरांना अन्नदान

By admin | Updated: September 11, 2016 17:49 IST

पल्या वडिलांचा तेराव्याचा कार्यक्रम न करता सामाजिक बांधीलकी जोपासून वृध्दाश्रमातील वृध्दांना व मुकबधीर विद्यार्थ्यांना अन्नदान केले.

ऑनलाइन लोकमत 
मंगरुळपीर, दि. ११ -  समाजातील प्रचलीत रुढी परंपरांना फाटा देत तालुक्यातील दस्तापूर येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश मुंजे यांनी आपल्या वडिलांचा तेराव्याचा कार्यक्रम न करता सामाजिक बांधीलकी जोपासून वृध्दाश्रमातील वृध्दांना व मुकबधीर विद्यार्थ्यांना अन्नदान केले.
हिंदू संस्कृतीत व्यक्तीच्या निधनानंतर काही धार्मिक सोपस्कार पार पाडणे गरजेचे असल्याचे मानले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने दशकार्य, तेरवी किंवा वर्षश्राद्ध आदिंचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रत्यक्षात वडील किंवा आई जिवंत असताना त्यांच्या आरोग्यावर, खाण्यापिण्यावर खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहणारे व्यक्ती त्यांच्या निधनानंतर मात्र तेराव्यासारख्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात खर्च करतात; परंतु काही लोक याला अपवाद आहेत. 
त्यामध्येच दस्तापूर येथील रमेश मुंजे यांचा समावेश करावा लागेल. रमेश मुंजे यांचे वडील वृद्धापकाळात आजारामुळे खाटेला खिळले असताना रमेश मुंजे यांनी त्यांच्यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करण्यावर खर्च केला; परंत त्यांचे वडील नामदेवराव मुंजे यांचे २८ आॅगस्ट रोजी दीर्घ  आजारामुळे  निधन झाले होते. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ९ सप्टेंबर रोजी करण्याचे ठरविण्यात आले होते; परंतु रमेश मुंजे यांनी वडिलांच्या तेरवीचा कार्यक्रम न करता शहरालगत असलेल्या तुळजापूर येथील चित्रऋषी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ वृध्द व मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान केले. 
रमेश मुंजे यांनी वडिलांच्या तेरवीवर परंपरेनुसार खर्च न करता मूकबधिरांना अन्नदान  करण्याचा उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण केला आहे.  या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे,  नगरसेवक अनिल गावंडे, शिवसेना शहर प्रमुख विवेक नाकाडे,  किशोर कदम,  रवि राऊत, सुरज बुरे, जुबेर मोहनावाले,  सरपंच अविनाश आटपटकर,श्रीमंत खांडेकर, मुकेश मुंजे, प्रा.मनवर, पत्रकार प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर, बालु काळे, राजेश दबडे, शिक्षक ए.बी.राठोड,  यांचेसह आदिंची उपस्थिती होती.