शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर स्मार्ट सिटीचे सहावे सीईओ म्हणून अविनाश ढाकणे यांनी घेतला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:15 IST

सोलापूर दि २३ : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या कामाची प्रगती लवकरच दृश्य स्वरूपात दिसेल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त तथा कंपनीचे प्रभारी सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

ठळक मुद्देकंपनीचे सीईओ संजय तेली यांनी अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे राजीनामा सादर वर्षभराच्या कारकिर्दीत दोन अध्यक्ष व पाच सीईओंनी कारभार पाहिलास्मार्ट सिटीच्या कामांची शहरात कुठेच चुणूक दिसत नाहीकामांच्या प्रगतीबाबत या दोन्ही सल्लागार संस्थांना उद्दिष्ट दिले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या कामाची प्रगती लवकरच दृश्य स्वरूपात दिसेल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त तथा कंपनीचे प्रभारी सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे सीईओ संजय तेली यांनी गेल्या महिन्यात अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे राजीनामा सादर केला. अशाप्रकारे स्मार्ट सिटी कंपनीच्या वर्षभराच्या कारकिर्दीत दोन अध्यक्ष व पाच सीईओंनी कारभार पाहिला आहे. इतके अधिकारी बदलले, मात्र स्मार्ट सिटीच्या कामांची शहरात कुठेच चुणूक दिसत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांवर शहरवासीयांची नाराजी आहे. ‘लोकमत’ने ‘स्मार्ट सिटीची दशा’ या वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाश टाकला. मंगळवारी आयुक्त डॉ. ढाकणे यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे सहावे सीईओ म्हणून पदभार घेतला. या वृत्तमालिकेची दखल घेत त्यांनी लागलीच कंपनीच्या सल्लागार संस्था क्रिसील व एसजीएस कंपनीच्या प्रतिनिधींच्या बैठका घेतल्या. कंपनीच्या कामांच्या प्रगतीबाबत त्यांनी आढावा घेऊन लोकांना दृश्य स्वरूपात स्मार्ट सिटीचे काम दिसण्यासाठी प्राधान्याची कामे हाती घेण्याची सूचना केली. स्मार्ट सिटी कंपनीने सहा प्रकल्पांवर जी कामे केली आहेत, ती पूर्णत्वावर नेऊन लवकर लोकार्पण केली जातील असे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले. कामांच्या प्रगतीबाबत या दोन्ही सल्लागार संस्थांना उद्दिष्ट दिले आहे. वेळेत काम न झाल्यास दंड करण्याची ताकीद दिली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर सुधारण्याच्या कामावर भर देण्यात येणार आहे. तलावाभोवती बगिचा व इतर कामांबाबत अर्बन डेव्हलपमेंट व पुरातत्व विभागाच्या आवश्यक त्या परवानग्यासाठी पाठपुरावा करा अशा सूचना दिल्या. सिद्धेश्वर मंदिर परिसर सुुधारणेला प्राधान्य दिले जाणार आहे. परिसरातील बगिचा व इतर कामांचे डिझाईन तयार आहेत. आता या कामांचे टेंडर काढण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. --------------------स्ट्रीट मार्केटला प्राधान्यसिद्धेश्वर मंदिर प्रवेशद्वारासमोरच स्ट्रीट मार्केट भरविण्याबाबत आयुक्त ढाकणे यांनी माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याकडेला असलेल्या झोपड्या व दुकानांचे अतिक्रमण झाले आहे. या मार्गाबाबत यापूर्वीच झालेला मास्टर प्लान अमलात आणला जाईल.याबाबतच नेमकी काय स्थिती आहे याची फाईल त्यांनी मागविली आहे. हे अतिक्रमण हटवून मंदिर प्रवेशद्वार व दर्गाहसमोर स्ट्रीट मार्केट वसविण्यात येईल. यात्रा काळात हे मार्केट दीड महिना इतरत्र हलविले जाईल. या ठिकाणी दररोज सहा हजार लोक भेट देतात. शहराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा भाग असून, तो विकसित केला जाणार आहे.