सोलापूर : एटीएम मशिनला आग लागल्याची घटना येथे बुधवारी दुपारी घडली. आसरा चौकातील अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. अचानक या एटीएम सेंटरमधील मशीनने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली.ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या एटीएममध्ये रोकड नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. एटीएमशेजारीच अनेक दुकाने असल्याने आग पसरण्याची भीती होती. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. (प्रतिनिधी)
सोलापुरात आगीत एटीएम मशिन खाक
By admin | Updated: January 12, 2017 03:57 IST