शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपीला सोडविण्यासाठी मदत का करतो म्हणून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST

मोहोळ : येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना सोडविण्यासाठी मदत का करतो असे म्हणून सात जणांनी तलवार, लोखंडी गज ...

मोहोळ : येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना सोडविण्यासाठी मदत का करतो असे म्हणून सात जणांनी तलवार, लोखंडी गज आणि काठीच्या सहाय्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. १६ सप्टेंबर रोजी मोहोळ येथे ही घटना घडली. १८ रोजी गुन्हा नोंदवला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ दगडू गायकवाड (रा. संतपेठ, पंढरपूर) आणि मोहोळ येथील शिवसैनिकाच्या दुहेरी खून प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे कायकर्ते संतोष सुरवसे व रोहित फडतरे मित्र आहेत. संतोष सुरवसे व रोहित फडतरे यांची जेलमधून सुटका व्हावी यासाठी नवनाथ गायकवाड प्रयत्न करीत आहे. १६ सप्टेंबर रोजी नवनाथ गायकवाड हा पंढरपूरला जाण्यासाठी बसस्थानकासमोर थांबला होता.

यावेळी विकास बनसोडे, विनोद कांबळे, राहुल उर्फ दादा क्षीरसागर, बाळू क्षीरसागर, ऋषी क्षीरसागर, चिम्या बनसोडे, भैय्या क्षीरसागर (सर्व, रा. सिद्धार्थनगर, मोहोळ) या सात जणांनी काठ्या, लोखंडी गज व तलवार घेऊन फिर्यादी नवनाथ गायकवाड याला घेराव घातला. संतोष सुरवसे व रोहित फडतरे यांच्या सोबत का फिरत होता, त्यांनी आमच्या गल्लीतील दोघांचा खून केला आहे, तू त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत का करतोस’ असे म्हणून त्याला तलवार, लोखंडी गज व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करीत आहेत.

----

गळ्यातील चेन काढून घेतली

या हल्ल्यात एकाने त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. नवनाथ गायकवाड याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामधे दाखल केले होते. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नवनाथ गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सात जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

----