शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

मूल्यांकनाचे निकष निश्चित

By admin | Updated: June 9, 2014 01:03 IST

शासन आदेश जारी: जिल्ह्यात ८०० प्राध्यापकांना मिळणार लाभ

सोलापूर : राज्यातील कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या मराठी माध्यमाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना अनुदान सूत्र लागू करण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून ४ जूनच्या निर्णयान्वये मूल्यांकनाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत़ या निकषांमुळे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या १० हजार तर जिल्ह्यातील ८०० प्राध्यापकांचा वेतनाचा प्रश्न मिटला आहे़ पहिल्या टप्प्यात २६ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द वगळण्याचा निर्णय झाला होता़ आताच्या निर्णयान्वये शाळांचे मूल्यांकन सुरु झाल्याने वेतन या विषयाला गती मिळाली आहे़ काही कनिष्ठ महाविद्यालयांचा सुधारित सेवकसंच नसल्याने पद मंजुरीची कार्यवाही करण्यात आलेली नाही़ या प्रश्नावर कृती समितीच्या शिष्टमंडळाने पुणे विभाग उपसंचालिका सुमन शिंदे यांना भेटून निवेदन दिले़ तसेच या महाविद्यालयांचा रोष्टर तपासून शिक्षक मान्यतेसाठी शिबीर लावण्याबाबत विचारणा करण्यात आली़ यावर उपसंचालकांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले़ या शिष्टमंडळात कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, कार्याध्यक्ष मारुती गायकवाड आदी सहभागी झाले होते़ -------------------------पात्रतेसाठी आवश्यक गुणशासननिर्णयानुसार विज्ञान शाखेसाठी १०० गुण व कला, वाणिज्य शाखेसाठी ९४ गुण विहीत करण्यात आले आहेत़ त्यानुसार शैक्षणिकदृष्ट्या मागास गटातील विज्ञान शाखेसाठी ६५ गुण व कला, वाणिज्य शाखेसाठी ६१ गुणांची गरज आहे़ तसेच इतर गटात विज्ञान शाखेसाठी ७० गुण तर कला, वाणिज्य शाखेसाठी ६६ गुण पात्र होतील, अशा शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित होतील़ तथापि या करिता शाळेची शैक्षणिक गुणवत्ता या बाबीसाठी विहीत केलेल्या ५० गुणांपैकी ७५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे़ ----------------------------- मूल्यांकनाचे निकष़़़शाळेची शैक्षणिक गुणवत्ता (५० गुण)उच्च माध्यमिक शाळेसाठी प्रत्येक वर्गाच्या हजेरीचे प्रमाण (१० गुण)शालांत परीक्षेचा निकाल (१० गुण) परीक्षेतील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण (०५ गुण)शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संख्येचे प्रमाण (०५ गुण)कमी विद्यार्थी गळतीचे प्रमाण (०५ गुण)शाळेमध्ये आधुनिक उपकरणांचा अध्यापनासाठी वापर (०५ गुण)शाळेमध्ये शिकणाऱ्या शिक्षकांचा दर्जा (०५ गुण)कार्यकक्ष शालेय व्यवस्थापन (०५ गुण)---------------------------