शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात डेंग्यूचा दुसरा बळी, आणखी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 21:26 IST

सोलापूर दि ७ : प्रशासनाकडून सारे काही आलबेल असल्याचे सांगितले जात असताना गुरुवारी शाळकरी मुलीचा डेग्यूने बळी गेलेला असताना सोमवारी आणखी एका मुलाचा मुलाचा बळी गेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विकास शंकर गन्हावाले (वय- १२, रा. विद्यानगर, काळभैरव मठाजवळ, सोलापूर)  असे मयत मुलाचे नाव आहे. शासकीय रुग्णालयात अन्य दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत.  सुमेधा शिवशरण (वय- १२, रा. अक्कलकोट) आणि शैलेश सुधीर साळुंके (वय- २२, रा. सोलापूर) असे डेंग्यूसदृश्य आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नाव आहे. 

ठळक मुद्देशहरात एकच खळबळ उडाली दोन रुग्णांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरुआरोग्य विभागाना सतर्क राहण्याच्या सूचना

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : प्रशासनाकडून सारे काही आलबेल असल्याचे सांगितले जात असताना गुरुवारी शाळकरी मुलीचा डेग्यूने बळी गेलेला असताना सोमवारी आणखी एका मुलाचा मुलाचा बळी गेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विकास शंकर गन्हावाले (वय- १२, रा. विद्यानगर, काळभैरव मठाजवळ, सोलापूर)  असे मयत मुलाचे नाव आहे. शासकीय रुग्णालयात अन्य दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. सुमेधा शिवशरण (वय- १२, रा. अक्कलकोट) आणि शैलेश सुधीर साळुंके (वय- २२, रा. सोलापूर) असे डेंग्यूसदृश्य आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर-जिल्ह्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहणी दिसून येत आहे. खासगी आणि सरकारी दवाखान्यामध्ये उपचारांसाठी येणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ दिसू लागली आहे. प्राथमिक केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालयातील आरोग्य विभागाना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी सोलापुरातील मॉडर्न शाळेत शिकणारी सुकन्या विवेक इंगळे हिचा डेंग्यूने बळी गेलेला आहे. शासकीय रुग्णालयात उपचार करुन तिला मार्कंडेय रुग्णालयात उपचार चालू असताना तिच्या शरीरातील प्लेटलेटस्  ६० हजारावर आल्याने ताप वाढून तिचा मृत्यू झाला. तपासणीत तिला ‘जापनीज इन्फेलायटीस’ (डेंग्यूचा प्रकार) आढळला होता. हा प्रकार ताजा असतानाच विकास गन्हावाले (वय- १२,रा. विद्यानगर, सोलापूर) डेंग्यूसदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याने अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून ३ आॅगस्ट रोजी पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखलकेले होते. त्याची तपासणी केली असता डेंग्यूची पॉझिटिव्ह लक्षणे आढळली. डॉक्टरांकडून केल्या जाणाºया उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या आणखी दोन रुग्णांवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. यात सुमेधा शिवशरण (वय- १२) ही अक्कलकोटची मुलगी असून, तिच्यावर बी ब्लॉक मधील बालरोग विभागातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याशिवाय व्ही. एम. मेडिकल वैद्यकीय महाविद्यायात  शिक्षण घेणारा  विद्यार्थी शैलेश सुधीर साळुंके यालाही डेंग्यूची लागण झाली असून, बाहेरुन केलेल्या तपासणीत पाझिटिव्ह अहवाल आला आहे. शुक्रवारपासून शासकीय रुग्णालयामध्ये ए ब्लॉकमध्ये अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असून, रुग्णालयाच्या तपासणीमध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह असून, त्याच्यावर वैद्यकीय अधिकाºयांच्या देखेरेखाली उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. विठ्ठल दडके यांनी स्पष्ट केले.