शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोटमधील संतप्त शेतकऱ्यांनी चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले

By appasaheb.patil | Updated: June 5, 2023 16:55 IST

बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.

शंभुलिंग अकतनाळ

चप्पळगांव : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून शासनाने आमची चेष्टा केली आहे, आणि कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असून हे काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, या भूमिकेतून संतप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील इटगे, ब्यागेहळ्ळी परिसरात चालू असलेले ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले.

बाधित शेतीच्या मोबदल्यात चार लाखांपासून सात लाखांपर्यंत भरपाई शासनाने जाहीर केली आहे. मात्र ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मंजूर नाही. याबाबतीत गेल्या सहा महिन्यांपासून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर, आणि बार्शी येथील बाधित शेतकरी संतप्त झाले आहेत. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाधित शेतकऱ्यांनी सोलापूर आणि मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतीत व्यथा मांडली असता लवकरच बैठक लावून असे आश्वासन वेळोवेळी मिळाले.

मात्र अद्यापही बैठक न झाल्याने शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. मागील महिन्यात सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, महेश हिंडोळे, सुरेखा होळीकट्टी आणि बार्शीचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन बाधित शेतीच्या संदर्भात प्रश्न मार्गी लावावा याविषयी थेट विचारणा केली होती असे असूनही अजूनही बैठकीच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावरून कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्याने बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. 

संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, बसवराज होळीकट्टी, प्रियंका दोड्याळे, परमेश्वर गाढवे, विकी गाढवे, अमोल वेदपाठक, महेश भोज, चेतन जाधव आदींसह चपळगाव, धोत्री, बोरेगांव, डोंबरजवळगे, तीर्थ, हालहळ्ळी(अ), चपळगाववाडी, दहिटणेवाडी, कोन्हाळी, अक्कलकोट ग्रामीण, हसापुर, इटगे, नागुर, बोरीउमरगे, मैंदर्गी, नागुर, दुधनी गावांतील बाधित शेतकरी यावेळी उपस्थित होते.