शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...आणि ती आत्महत्येपासून परावृत्त झाली!, मुख्यमंत्र्यांनी घेतली एसएमएसची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:27 IST

पतीकडून पोटगी मिळत नसल्याने नई जिंदगी परिसरातील एका महिलेने मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.

अमित सोमवंशी सोलापूर : पतीकडून पोटगी मिळत नसल्याने नई जिंदगी परिसरातील एका महिलेने मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तत्काळ दखल घेऊन तो एसएमएस पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना पाठविला. यावर तातडीने कार्यवाही करीत एमआयडीसी पोलिसांनी तिचे समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.विड्या वळण्याचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेला महिना १२०० रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. परंतु अनेक वर्षांपासून तिला पोटगी मिळालेलीच नाही. त्यापोटीचे थकीत १ लाख ३ हजार रुपये मिळावेत, अशी तिची मागणी होती. त्यातूनच त्रस्त होत तिने मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठविला.पोलीस निरीक्षक कमलाकार पाटील, भाग्यश्री जाधव यांनी पोटगी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन महिलेचे समुपदेशन केले. शताब्दी ग्रुपचे अध्यक्ष रसूल पठाण यांनी दोन महिन्यांचा किराणा देण्याचे जाहीर केले.असा होता एसएमएसमला पाच वर्षांचा मुलगा आहे. नवºयाने तलाक दिला आहे. पण पोटगी लागू होऊनही तो देत नाही. मी उपाशी राहू शकते; पण मुलाला का उपाशी ठेवू? त्याचा काय दोष? विड्या वळून महिन्याला ८०० ते १००० रुपये मिळतात. ते पण घरभाडे भरते. कसे पोट भरू सांगा? या नैराश्येतून मी आत्महत्या करीत आहे. काय करू मी मुख्यमंत्री सर तुम्हीच सांगा? कायद्यावर विश्वास ठेवून इतकी वर्षे गप्प राहिले; पण आता उपासमारीमुळे माझी सहनशक्ती संपल्यामुळे मी माझ्या मुलाबरोबर आत्महत्या करत आहे.