शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

आमुची मिराशी पंढरी। आमचे घर भीमातीरी।

By admin | Updated: July 7, 2014 00:55 IST

पंढरीत तीन लाख भाविक; दर्शनरांग पत्राशेडच्याही पुढे, दर्शनाला आठ तासांचा कालावधी

 पंढरपूर:‘आमुची मिराशी पंढरी। आमुचे घर भीमातीरी।।१।।पांडुरंग आमुचा पिता।रखुमाई आमची माता।।२।।भाऊ पुंडलिक मुनी। चंद्रभागा आमुची बहीण।।३।। तुका जुनाट मिराशीं। ठाव दिला पायांपाशीं।।४।।’कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनओढीने पंढरीत तीन लाख भाविक दाखल झाले असून, पददर्शन रांग नऊ पत्राशेड भरून पुढे गेली आहे. यामध्ये ८० हजार भाविक दर्शनासाठी थांबले आहेत; तर मुखदर्शन रांगही तुकाराम भवनाच्या पाठीमागे गेली आहे. वाळवंटात दाखल झालेले भाविक हरिजागरात तल्लीन झाले असून, हा सोहळा संपेपर्यंत वारकऱ्यांचे घर असलेल्या भीमातीरावर भक्तीचा सूर निनादणार आहे.मैलोन्मैल पायी प्रवास करून आलेल्या ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताबाई, जनाबाई, सोपानकाका, गोरोबा यासह मानाच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या आहेत, तर ज्ञानेश्वर माऊलींनी टप्पा पार करून पंढरपूर तालुक्याचे स्वागत स्वीकारले. तुकोबाही तालुक्यातील पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी विसावले. खेळ, धावा, रिंगण असा खेळ खेळत पंढरी समीप आल्याच्या आनंदाने ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग’ असे म्हणत वारकऱ्यांनी पंढरीचे आदरातिथ्य स्वीकारत विठुरायाच्या पावन तालुक्यात प्रवेश केला. पालख्या पंढरीत दाखल होणार असल्याने पालख्यांसोबतचे वारकरी आधीच पंढरपूर गाठून दर्शनासाठी पददर्शन रांगेत थांबत आहेत. एका भाविकाला पददर्शनासाठी आठ ते साडेआठ तास कालावधी लागत असल्याचे हादगाव (ता. केज, जि. बीड) येथील युवराज नामदेव यादव, राणाण्णा संताजी कोंडरू (रा. पिंपळा, ता. बिलोली, जि. नांदेड) यांनी सांगितले.ज्ञानोबा भंडीशेगाव तर तुकोबा पिराची कुरोली येथील मुक्काम आटोपून सोमवारी वाखरीकडे रिंगण, खेळ, धावा करीत निघणार आहेत. पालख्या पंढरपूर समीप आल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असून, चंद्रभागेत पाणी आल्याने पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी लगबग सुरू झाली आहे. ------------------आॅनलाइनसाठी ७५ हजार नोंदणीविठ्ठलाचे झटपट दर्शन घेण्यासाठी ७५ हजार भाविकांनी आॅनलाइन दर्शन नोंदणी केली असून, आतापर्यंत ३0 हजार भाविकांनी याचा लाभ घेतला आहे. रविवारी दिवसभर ६ हजार ५०० भाविकांनी आॅनलाइन दर्शन घेतले. मुख्य तीन दिवसांची नोंदणी फुल्ल झाली असून, यात्रा कालावधीसाठी मंदिर समितीने १ लाख १0 हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. चंद्रभागेत नौकाविहारचंद्रभागा वाळवंटात पाणी आल्याने होड्या पुन्हा सुरू झाल्या असून, भाविकांनी शिणवटा घालविण्यासाठी होडीत बसून चंद्रभागेच्या पात्रात नौकाविहार सुरू केला आहे. यामुळे होडीचालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. स्वच्छतेसाठी शौचालय उभारण्यात आल्याने भाविक चंद्रभागा वाळवंटाचे पावित्र्य राखत आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी यंत्रणापददर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या भाविकांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांबरोबर स्वयंसेवकांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय लोखंडी बॅरिकेडिंगही दर्शनरांगेला करण्यात आल्याने यंदा घुसखोरीवर आळा बसला आहे.