शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोटच्या बाप्पाचा आंध्रात रुबाब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकोट : गणेश प्रतिष्ठापनेसाठी अक्कलकोट तालुक्यात तब्बल ९० हजार गणेश मूर्ती तयारीचे काम सुरू असून, हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अक्कलकोट : गणेश प्रतिष्ठापनेसाठी अक्कलकोट तालुक्यात तब्बल ९० हजार गणेश मूर्ती तयारीचे काम सुरू असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येही या मूर्तींचा रुबाब दिसणार आहे. त्यासाठी कारागिरांकडून त्यावरून अखेरचा हात फिरवला जात आहे.

यंदा ६ सप्टेंबर रोजी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे. अक्कलकोट शहरातील कुंभार गल्लीत गणेश मूर्ती दरवर्षी बनवण्याचे काम कलाकार करताहेत. त्याठिकाणी जागेची कमतरता भासत असल्याने हा व्यवसाय गाणगापूर रोडवरील औद्योगिक वसाहतीत हलविण्यात आला आहे. मागील तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय सुरू आहे. यंदाही लाखो मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामात असंख्य कारागीर गुंतलेले आहेत.

----

सहा फुटांपर्यंतच्या मूर्ती

अक्कलकोट औद्योगिक वसाहत ही आता गणेश नगर बनली आहे. आठ कुटुंब तीन पिढ्यांपासून मूर्ती बनविण्याचे काम करते आहे. दरवर्षी घरगुती, सार्वजनिक मंडळ असे जवळपास ९० हजार ते १ लाख मूर्ती बनवतात. १ फूट ते ६ फुटांपर्यंत या मूर्ती बनवल्या जातात. त्या शेडूच्या बनवल्या जात असल्या तरी मागणी प्लास्टरच्या मूर्तीला अधिक आहे. गणेश मूर्ती आंध्र प्रदेश, हैदराबाद, कर्नाटक या येथे विक्रीस जातात. याशिवाय स्थानिक पातळीवर उमरगा, सांगोला, मंगळवेढा येथून सर्वाधिक मागणी आहे.

---

दरवर्षी लाखो मूर्ती बनवल्या जातात. महाराष्ट्रासह परराज्यात विक्रीला जातात. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्या परराज्यात जातील. आठ कुटुंबातील कारागीर वर्षभर काम करतात.

- भीमाशंकर कुंभार

कारागीर

----

फोटो : २० अक्कलकाेट

अक्कलकोट येथे गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना भीमाशंकर कुंभार आणि त्यांचे कुटुंब.