शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ईडी कारवाईच्या भितीनेच अजित पवारांचा निर्णय; सुजात आंबेडकर स्पष्टच बोलले

By appasaheb.patil | Updated: July 2, 2023 19:30 IST

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, फुले - शाहू- आंबेडकर यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात पुरोगामी, समाजवादी असल्याचा नारा देत राजकारण करणाऱ्यांचं खरा चेहरा पुढे आला आहे.

सोलापूर : ईडी कारवाई व सोळा आमदारांच्या अपात्रेच्या भितीनेच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची टिका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली. 

सोलापुरात एका कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकर आल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. सोलापुरात एका कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकर हे रविवारी आले होते. त्यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रागृहात पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासोबत वंचितचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद, जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, अझरुद्दीन शेख, विनोद जाधव, अमर डूरके, प्रेम सिद्धगणेश, जगुसिंग टाक, विनोद इंगळे, अनिरुद्ध वाघमारे, राजरत्न फडतरे, विक्रांत गायकवाड आदी उपस्थित होते. 

ईडीची कारवाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पक्ष चिन्ह भेटू नये व  शिवसेनेच्या शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनाच्या भीतीने राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह अन्य नऊ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उरकला. अजित पवारांनी बंड केले, राष्ट्रवादी फुटली असे न म्हणता सरळ सरळ राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारला उघड पाठिंबा दिला, तो पक्षाचाच निर्णय असावा. पहाटेच्या शपथविधीलाही राष्ट्रवादीचा पाठिंबा होता आणि आता दुपारच्या शपथविधीलाही राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले. 

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, फुले - शाहू- आंबेडकर यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात पुरोगामी, समाजवादी असल्याचा नारा देत राजकारण करणाऱ्यांचं खरा चेहरा पुढे आला आहे. यापूर्वी ते छुपा पाठिंबा देत होते. ते आता उघडपणे पाठिंबा देत आहेत. देशात लोकशाही व संविधान मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांना साथ देण्यात येत आहे. साथ देण्याचा निर्णय तथाकथित समाजवादी पुरोगामी पक्षाने घेतला. भाजपाला बळकटी देणारी ए, बी, सी टीम कोण ? हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलेले आहे. राजकारणातील हे आजचे शेवटचे वळण नव्हे तर यापुढेही वेगळे चित्र दिसणार असल्याचेही ते म्हणाले.