शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

१५ आॅगस्टपासून विमानसेवा

By admin | Updated: July 13, 2014 01:18 IST

सर्व संबंधितांची बैठक : विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुढाकार

सोलापूर : बंद पडलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हाकेला ओ देऊन ‘सुप्रीम एअरलाईन्स’ ही कंपनी पुढे आली असून, १५ आॅगस्टपासून नियमित विमानसेवा सुरू करण्याची तयारी झाल्याचे मोहिते-पाटील यांनी आज शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांसमवेत उपस्थित झालेल्या बैठकीत जाहीर केले़ व्यापारी, उद्योजक वर्गातून विमानसेवेची मागणी केली जात आहे़ खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे विमानसेवा सुरू करण्याचा आग्रह धरला होता़ त्यानुसार खा़ मोहिते-पाटील यांनी ‘सुप्रीम एअरलाईन्स’ या खासगी विमान कंपनीशी त्यांनी चर्चा केली़ कंपनीचे अमित अग्रवाल यांनी सोलापूरसाठी नियमित विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे़ ही माहिती देत १५ आॅगस्टपासून ही विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा मोहिते-पाटील यांनी केली़ सोलापूर-मुंबईसाठी नियमित ९ सीटचे विमान ही सेवा देणार आहे़ गरजेनुसार विमानाच्या फे ऱ्या किंवा अतिरिक्त विमान उपलब्ध करण्यात येणार आहे़ छोटे विमान उतरण्यासाठी जुहू विमानतळ सोयीचे आहे़ जास्त प्रवासी क्षमतेचे विमान सांताकू्रझ विमानतळावर उतरविण्यासाठी सिग्नलची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे़ त्यामुळे कमी प्रवासी क्षमतेचे विमान तूर्तास ही सेवा देणार आहे़ गरजेनुसार त्यात वाढ होण्याची शक्यता आहे़ विमानभाडे ५,५०० रु़(अंदाजे) असून, सेवा सुरू होण्यासाठी डीजीसीए (डायरेक्टर जनरल आॅफ एव्हिएशन) कडून अंतिम मान्यता आवश्यक आहे़ ती प्राप्त होताच सेवा सुरू होईल, असे मोहिते-पाटील यांनी सांगितले़ पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी होटगी रोडच्या विमानतळाचे पोलीस आॅडिट केल्याचे सांगताना काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला केल्या आहेत़ ही बाब नजरेस आणून दिली़ प्राधिकरणाचे वरिष्ठ अधीक्षक संतोष कौलगी यांनी त्यासाठी ४५ दिवसांची मुदत मागितली़ महापौर अलका राठोड यांनी विमानसेवेच्या निर्णयाचे स्वागत केले़ सोलापुरात थीम पार्क उभारत असल्याने नवी विमानसेवा पूरक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले़ उद्योजक केतन शहा, विश्वनाथ करवा, पेंटप्पा गड्डम, लोटस हॉटेलचे प्रितीश शहा यांनी मोहिते-पाटील यांना धन्यवाद दिले़ विमानसेवेसंदर्भात काही सूचना केल्या़ त्यात प्रवासी क्षमता, विमानांची जाण्या-येण्याची वेळ, प्रवासीभाडे आदींचा समावेश आहे़ उपस्थित उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या भावना मोहिते-पाटील यांनी विमान कंपनीचे प्रमुख अग्रवाल यांना मोबाईलवरून कळविल्या़ या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मनपाचे सहायक आयुक्त पंकज जावळे, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, बांधकाम खात्याचे शिंदे, विमानतळाचे प्रभारी अनिल श्रीवास्तव, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, उद्योजक जितेंद्र राठी, बाबुराव घुगे, कय्युम बुऱ्हाण, भूविकास बँकेचे माजी चेअरमन चंद्रकांत घोडके, जि़ प़ सदस्य उमाकांत राठोड, शफी इनामदार, एम़ डी़ शेख, चेंबरचे माजी सचिव केतन शहा, विश्वनाथ करवा, बशीर शेख, नंदू आहुजा, उमेश ऐनापुरे, राजगोपाल झंवर, प्रथमचे उल्हास सोनी, त्रिपुरसुंदरीचे राकेश कटारे, रुबी ट्रॅव्हलचे आसिफ शेख, चेंबरचे एऩ आऱ पाठक, कुशल शहा आदी उपस्थित होते़ ------------------------------अशी असेल विमानसेवासोलापूर-मुंबई दररोज फेरी प्रवासी क्षमता - ९ प्रयाण - सकाळी ८ वा़, आगमन- सायंकाळी ५ वा़ मागणीनुसार वेळेत बदल होण्याची शक्यता प्रवासीभाडे ५,५०० (अंदाजे)गरजेनुसार फेऱ्यांत वाढ, संख्याही वाढेल