शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उजनी धरण काठावर गुलाबी मैनांची हवाई सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:25 IST

करमाळा तालुक्यातील पारेवाडी, कोर्टी, आळसुंदे, हिंगणी व केत्तूर परिसरातील पणस्थळावरच्या काठावरील झाडाझुडुपांमध्ये लाखांच्या संख्येने या सध्या मुक्कामाला आहेत. ...

करमाळा तालुक्यातील पारेवाडी, कोर्टी, आळसुंदे, हिंगणी व केत्तूर परिसरातील पणस्थळावरच्या काठावरील झाडाझुडुपांमध्ये लाखांच्या संख्येने या सध्या मुक्कामाला आहेत.

इंग्रजीमध्ये रोझी पॅस्टर व स्टर्लिंग या नावाने ओळखले जाणारे हे पक्षी युरोपातील हिवाळ्यात जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करून घेण्यासाठी भारतात येतात. विशेष करून महाराष्ट्रातील ज्वारी पिकणाऱ्या प्रदेशात बहुसंख्येने त्या येतात. जिल्ह्यातील कोरडवाहू पिकांकडून बागायतीकडे वळले आहेत. परिणामी ज्वारीचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्या भोरड्याही आता आपल्या खाद्य सवयीत बदल करीत सध्या ते द्राक्ष, पपई, अंजीर, डाळिंब यासारख्या फळपिकांवर उपजीविका करीत आहेत. हे पक्षी अमाप संख्येनी उभ्या पिकांवर डल्ला मारत असल्याने ते शेतक-यांना उपद्रवी ठरतात. ज्वारीची सुगी संपल्यानंतर म्हणजे एप्रिलमध्ये हे पक्षी आपल्या मायदेशी परततात.

करमाळा तालुक्यातील विविध पाणस्थळाजवळ असलेल्या झाडांवर हे पक्षी दररोज मुक्कामाला येतात. दिवसभर उदरनिर्वाहासाठी हजारोंचा थवा करून पंचक्रोशीत हे पक्षी विखरून जातात व सायंकाळच्या वेळी मुक्कामासाठी अनेक थवे एकत्र येतात.

असा आहे पक्ष्यांचा दिनक्रम

या पक्ष्यांतील वैशिष्ट्य म्हणजे झाडावर आसनस्थ होण्यापूर्वी हजारांच्या संख्येत ठरलेल्या वेळेतच एकत्र येऊन हवाई कसरत करतात. हे विलोभनीय दृश्य सर्वांना थक्क करून सोडते. सुमारे पंधरा मिनिटांच्या कसरतीनंतर झाडावर विसावून दहा मिनिटे एकच कलकलाट करीत आपसात संवाद साधतात. अंधार दाटून आला की एकदम चिडीचूप होऊन झोपी जातात. सूर्योदयाबरोबर हे पुन्हा सुमारे दहा-बारा मिनिटे हवेत घोंगावत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. नंतर सर्व दिशेने विखरून जातात.

कोट ::::::::::::

एकेकाळी ज्वारीला प्राधान्य देणारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता सिंचनाचा अवलंब करीत नगदी पिकाकडे वळला आहे. आता ज्वारीचे क्षेत्र घटत असतानासुद्धा भोरड्या मात्र इकडे नित्यनियमाने येतातच. भोरड्या या परदेशी पक्ष्यांच्या वावराने जिल्ह्यात पक्षी वैभव टिकून राहिले आहे.

- डॉ. अरविंद कुंभार,

पक्षी अभ्यासक.

फोटो

०८करमाळा -बर्ड

ओळी : उजनी धरण काठावरील पारेवाडी (ता. करमाळा) येथे हजारोंच्या संख्येने आकाशात विहार करताना भोरड्या पक्षी.