शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीनंतरही पालकमंत्री, सहकारमंत्री गटाचा वाद सोलापूरात सुरूच, महापालिकेच्या सभागृहात सुचना दोघांनी वाचली, सभागृह नेता वाद कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 13:15 IST

सोलापूर महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यातील तहकुब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी झाली़ सभा सुरू झाल्यानंतर सुचना नागेश वल्याळ व श्रीनिवास रिकमल्ले या दोघांनी एकत्रितपणे वाचण्यास सुरूवात केली़

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन सहकारमंत्री व पालकमंत्री गटात मनोमिलन झालेले दिसून येत नाही़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापालिका बरखास्त करण्याबाबत पाठपुरावा करू : विरोधी सदस्यसोलापूर महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यातील तहकुब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी झाली़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : सोलापूर महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यातील तहकुब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी झाली़ सभा सुरू झाल्यानंतर सुचना नागेश वल्याळ व श्रीनिवास रिकमल्ले या दोघांनी एकत्रितपणे वाचण्यास सुरूवात केली़ याला विरोधी पक्षाचे आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे यांनी हरकत घेतली़ प्रभारी सभागृहनेता कोण आहे, सुचना दोन्हीजण एकाच वेळी कसे वाचन करीत आहेत, यावर गोंधळ सुरू झाला़ महापौर शोभा बनशेट्टी यांनी नागेश वल्याळ यांनी सुचना वाचावी असे आदेश दिले़ त्यावर उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासह पालकमंत्री गटाचे सर्वच सदस्य सभागृहाबाहेर पडले़ गोंधळातच वल्याळ यांनी सुचना मांडल्या़ त्यावर चेतन नरोटे यांनी सभागृहात कोरम आहे का असा प्रश्न उपस्थित केला़ या गोंधळातच राजकुमार हंचाटे यांनी उपसुचना वाचली़ त्यामुळे विरोधी सदस्य गोंधळ करू लागले़ या गोंधळातच महापौर शोभा बनशेट्टी यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर केल्याचे घोषित करून सभा तहकुब केली़ यानंतर काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपाचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे किसन जाधव, एमआयएमचे तौफिक शेख यांनी महापौर बनशेट्टी यांनी भेट घेतली़ शहराच्या विकासासाठी तुम्हाला आम्ही मदत करतो पण यापुढे सभागृहाचे कामकाज चालवा, वर्षभरात आमची एकही कामे झालेली नाहीत, यापुढे जर असेच झाले तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापालिका बरखास्त करण्याबाबत पाठपुरावा करू असा इशारा दिला़ ------------------खोटे बोल पण रेटून बोल........प्रभारी सभागृहनेता कोण याबाबत पार्टी मिटींगमध्ये चर्चा झाली का अशी विचारणा केल्यावर महापौर बनशेट्टी म्हणाल्या की, शहराध्यक्षांना याबाबत पत्र दिले आहे, त्यांच्याकडून कोणाचेच नाव आले नाही, मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे पालकमंत्र्याच्या अधिपत्याखाली समिती अद्याप गठीत झालेली नाही त्यामुळे माझ्या अधिकारात वल्याळ यांना बोलण्यास परवानगी दिली़ ते कायमचे सभागृहनेते नाहीत़ पार्टी मिटिंगमध्ये रिकमल्ले यांचे नाव ठरले असे खोटे पण रेटून सांगितले जात आहे मला याबाबत कोणीही बोलले नाही़ उपमहापौर बत्तुल व इतर सदस्यांनी पालकमंत्री गटाचे रिकमल्ले यांचे नाव सुचविले असे सांगितले़ एकुणच प्रभारी सभागृहनेता पदाचा वाद कायम आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन सहकारमंत्री व पालकमंत्री गटात मनोमिलन झालेले दिसून येत नाही़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका