शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

वकिलांनी पैसे कमवायची घाई टाळावी : महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 11:05 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यामुळे परिश्रम घ्या. नवीन वकिलांनी पैसे कमविण्याची घाई करू नये. पैशाच्या मागे लागलात तर यशाची संधी जाईल. सुरूवातीला ज्ञान संपादन करण्यासाठी कष्ट करा, असा संदेश महाराष्ट्राचे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आज येथे दिला.कुंभकोणी हे मूळचे सोलापूरचे आहेत. शिवाय ते सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य आहेत. महाअधिवक्तापदावर नियुक्ती झाल्याबद्दल असोसिएशनच्या वतीने येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण मारडकर, कुंभकोणी यांचे वडील अ‍ॅड. अरविंद कुंभकोणी, कुंभकोणी यांच्या पत्नी अनुजा, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष न्हावकर, खजिनदार यशोधन कणबसकर, अ‍ॅड. हेमंतकुमार साका आदी मंचावर होते.अ‍ॅड. कुंभकोणी म्हणाले, सोलापूर बार असोसिएशनला मी माझे कुटुंब मानतो. कुटुंबाकडून हा सत्कार होतोय. मी कोणत्याही सर्वोच्च पदावर पोहोचलो तरी सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात वकिली केली, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रपतीभवनात जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हाही मी माझ्या परिचयात सोलापूर कोर्टात वकिली केल्याचा उल्लेख करणे मी आयोजकांना भाग पाडले. राज्यातील मी सर्वोच्च विधी अधिकारी आहे. त्यामुळे कुटुंबप्रमुख आहे. ही जबाबदारी मी समर्थपणे पेलेन. सोलापूर बार असोसिएशनच्या कोणत्याही सदस्याने मला बेधडकपणे व्यक्तिगत स्वरूपाची मदत मागावी. मी ती करेन; पण महाअधिवक्तापदाची शान आणि मान राखण्याची माझी जबाबदारी आहे. तशी ती तुमचीही आहे. त्यामुळे मागितली जाणारी मदत ही रचनात्मक आणि सकारात्मक असली पाहिजे, असे ते म्हणाले.युवा वकिलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, वकिली व्यवसाय हा ठिसूळ आहे. या क्षेत्रात सुरूवातीला अपयश आले की, पुन्हा वकील यशस्वी होऊ शकत नाही. येथे एकदाच संधी मिळते. त्यामुळे नवीन वकिलांनी पैशाच्या मागे न लागता सुरूवातीला ज्ञानासाठी परिश्रम घेतले पाहिजे. या व्यवसायात नैतिकतेलाही महत्त्व आहे. ती जपली पाहिजे, असे ते म्हणाले. ज्येष्ठ वकिलांनाही त्यांनी संदेश दिला. कनिष्ठ वकिलांना स्पर्धक न मानता आपली संपत्ती मानावे आणि बार असोसिएशन विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी अ‍ॅड. थोबडे, अ‍ॅड. विजय मराठे यांनी कुंभकोणी यांच्यासंदर्भातील आठवणी सांगितल्या. प्रारंभी अ‍ॅड. मारडकर यांनी प्रास्ताविक केले. कणबसकर यांनी मानपत्राचे वाचन केले. अ‍ॅड. गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. रघुनाथ दामले, अ‍ॅड. अळंगे, पालिकेचे माजी उपायुक्त अनिल विपत, अ‍ॅड. गायकवाड यांच्यासह सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.