शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहिगाव योजनेच्या दुसऱ्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अग्रक्रम समितीची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या ...

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अग्रक्रम समितीची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली. या बैठकीमध्ये दहिगाव योजनेच्या ३४२.३० कोटींच्या दुसऱ्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली.

दहिगाव उपसा सिंचन योजनेला १९९६ साली ५७.६६ कोटींची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता २००९ साली १७८.९९ कोटींची मिळाली होती. हा निधी २०१६-२०१७ साली संपल्याने योजनेचे काम बंद होते. दरम्यान २०१९ ला आपण आमदार झाल्यानंतर या योजनेला दुसरी प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार या प्रस्तावास ३४२.३० कोटींची मान्यता देण्यासाठी अग्रक्रम समितीची बैठक झाली. यात मंजुरीचा निर्णय झाल्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी सांगितले.

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून २४ गावांतील एकूण १० हजार ५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हा निधी मंजूर झाल्यामुळे योजनेची उर्वरित कामे पूर्ण होऊन सर्व गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळू शकेल. तसेच मुख्य कॅनॉलचे अस्तरीकरण, पुलांची अपूर्ण कामे, पोटचारी व उपचाऱ्यांची कामे या निधीमधून अग्रक्रमाने पूर्ण केली जातील.

-----

पाणीदार माजी आमदाराच्या आयत्या पीठावर रेघोट्या दहिगाव योजनेच्या दुसऱ्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आ. संजयमामा शिंदे यांनी माजी आ. नारायण पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. पाटील स्वतः ला पाणीदार आमदार म्हणवून घेतात. परंतु त्यांनी दहिगाव योजनेसाठी एक रुपयाचा निधी मंजूर केला नाही. त्यांनी आयत्या पीठावर रेघोट्या मारल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

----

असा मिळाला निधी

कै. दिगंबरराव बागल यांच्या कार्यकाळामध्ये दहिगाव योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता मिळून ५७.६६ कोटींची तरतूद केली होती. हा निधी संपल्यानंतर २००९ साली शामलताई बागल या आमदार असताना पहिली प्रशासकीय मान्यता १७८.९९ कोटींची मिळाली. या मंजूर निधी मधूनच माजी आमदार पाटील यांनी दहिगाव योजनेची कामे केली. २०१७ साली हा निधी संपल्यानंतर दुसरा सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर होणे आवश्यक होते. परंतु पाटील यांच्या कार्यकाळामध्ये हा प्रस्ताव सादर झाला नाही. जानेवारी २०२० पासून दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याचे फलित म्हणून जुलै २०२१ मध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ३४२.३० कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.