शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

काय झाडी... काय डोंगर फेम शहाजीबापूंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा; जाणून घ्या कारण

By appasaheb.patil | Updated: November 8, 2022 18:00 IST

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सोलापूर - काय झाडी…काय डोंगर.. काय हाटील.. एकदम ओकेच.. असं म्हणणारे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पाहणीसाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज मंगळवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचे सोलापुरात आगमन होणार असून उद्या बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास ते सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पावसाचे चांगलेच थैमान घातले. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. आजही अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणीच पाणी दिसून येत आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते आणखीन काही कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार असल्याची माहिती युवा सेनेचे गणेश वानकर यांनी सांगितले. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हेही उपस्थित राहणार आहेत. दानवे यांचाही आज सोलापुरात मुक्काम असणार आहे. तरी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, युवती सेना, विद्यार्थी सेना, कामगार सेना, वाहतूक सेना तसेच शिवसेना प्रणित संघटनांनी स्वागत व सत्कारासाठी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण