शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !

By admin | Updated: March 18, 2017 18:09 IST

वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !

वीजबिल वसुल न केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई !प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांचे आवाहनसोलापूर : ग्राहकांना अचूक व वेळेवर वीजबिले देण्यासह थकबाकी वसुलीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. थकबाकी वसुली ही महावितरणची आर्थिक गरज आहे. त्यामुळे वसुलीमध्ये हयगय झाल्यास संबंधितांविरुद्घ कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिला.येथील बिजली भवनमध्ये आयोजित सोलापूर मंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर उपस्थित होते. प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी स्वत: पुढाकार घेऊन अधिकारी काम करत आहेत. मात्र काही ठिकाणी वारंवार सूचना देऊनही जे अधिकारी काम करीत नाहीत, त्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.वीजबिलांच्या थकबाकीची शंभर टक्के वसुली, ग्राहकांना अचूक बिल, वीजगळती कमी करणे व सुरळीत वीजपुरवठा करणे हे आपले मूलभूत उद्दिष्ट आहे. ते सर्वांनी पूर्ण करायचे आहे. साडेसात अश्वशक्ती व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषिपंपांना वीजमीटर अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्व कृषीपंपांना या महिन्याअखेर वीजमीटर बसविण्यात यावेत. ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याच्या कामास गती देऊन मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही ताकसांडे यांनी दिले. यावेळी सोलापूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अरुण थोरात, कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, सुनील यादव, संदीप सानप, सुरेश कोळी, अमसिद्घ हुवाळे, मधुसूदन बरकडे, प्रणाली विश्लेषक मकरंद बोराळकर यांच्यासह सोलापूर मंडलातील अभियंते, अधिकारी उपस्थित होते.